भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई हे लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावणार का? भारतातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते सामाजिक, राजकीय नेत्यांनाही पडत आहे.
भारताचे नवे सर न्यायाधीश म्हणून मे 2025 मध्ये भूषण गवई यांनी शपथविधी पार पाडला. खरे तर भारतातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्वच क्षेत्रातील राजकीय सामाजिक व्यक्तींना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारकडून वारंवार लोकशाहीची प्रतारणा होत असल्याचा आरोप राजकीय विरोधी पक्ष करत आहेत. ईव्हीएमच्या बाबतीत नागरिकांच्या आणि विरोधी पक्षांच्या मनात शंका आहे. विरोधी पक्षांनी वारंवार बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केलेली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती आपला पुत्र भूषण गवई यांना केलेली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे आंबेडकरवादी विचाराचे असून भारतात लोकशाही खंबीरपणे नांदावी यासाठी ते खंबीर पावले उचलतील अशी आशा भारतीय नागरिकांकडून होत असल्याची चर्चा संपूर्ण भारतभर सुरू आहे.