ISRO’s 101st mission fails-भारताचा पीएसएलव्ही सी- 61 हे रॉकेट अवकाशातून काही क्षणातच कोसळले 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने पीएसएलव्ही – 61 हा उपग्रह 18 मे 2025 रोजी अवकाशात सोडले होते; पण 888 किलोमीटरवरून अवकाशातून ते खाली कोसळले. इस्रोचे हे खूप मोठे अपयश आहे ;पण हे रॉकेट का कोसळले? याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया.

इस्रोची 101 वी मोहीम अयशस्वी- ISRO’s 101st mission fails

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. इस्रो ही संस्था स्थापन केल्यापासून आजतागायत इस्रोने 100 मोहिमा केल्या होत्या. सध्या अवकाशात सोडला गेलेला पीएसएलव्ही-सी 61 हा उपग्रह म्हणजे इस्रोची 101 वी मोहीम होती .मागील आठ वर्षांमध्ये इस्रोला पीएसीएलव्ही मोहिमांमध्ये पहिल्यांदा अपयश आलं आहे. याबाबत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकारांशी बोलताना आपण ही 101 वी मोहीम यशस्वी झालेलो नाही याची माहिती दिली.

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की पीएसएलव्ही सी- 61 चे चार टप्पे होते. त्यातील दोन टप्पे अपेक्षेप्रमाणे पार पडले. तिसऱ्या टप्प्यात नेमकी काय विसंगती होती? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी पुढील विश्लेषणानंतर पुन्हा प्रक्षेपणाचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खरे तर ही मोहीम सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, शेती क्षेत्रातील निरीक्षण, हवामान अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होती. पीएसएलव्ही सी- 61 रॉकेटच्या माध्यमातून ही मोहीम या अत्याधुनिक उपग्रहामार्फत रडार इमेजिंग केले जाणार होते. मागील अनेक वर्षापासून पीएसएलव्ही उपग्रहांच्या मोहिमा यशस्वी झालेल्या असून आत्ता अपवादात्मक स्थितीत खूप मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झालेली आहे. असे असले तरी यातील त्रुटी दूर करून सुधारणा करून इस्रो पुन्हा लवकरच मोहीम हाती घेईल अशी आशा आहे.

काय घडले तिसऱ्या टप्प्यात? What happened in the third stage?

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सर्व काही सुरळीतपणे चाललेले होते. पण तिसऱ्या टप्प्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला. रॉकेटच्या सॉलिड मोटरमध्ये चेंबर प्रेशर मध्ये अचानक घट झाली.त्यामुळे उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचू शकला नाही. ही समस्या सुमारे रॉकेट सोडल्यानंतर सहा मिनिटांनी निर्माण झाली
रॉकेट 888 किलोमीटर अंतरावर असताना ही घटना घडली. या अपयशामुळे उपग्रह भारतीय महासागरात कोसळला गेला. नोझल किंवा इंधन वितरण प्रणालीतील दोष अथवा इलेक्ट्रॉनिक किंवा सेंसर प्रणालीतील बिघाड अशी काही संभाव्य कारणे पुढे येत आहेत.

इस्रोने केली फेल्युअर ॲनालिसिस कमिटी स्थापन -ISRO sets up failure analysis committee

18 मे 2025 रोजी सोडलेल्या पीएसएलव्ही सी-61 या रॉकेटने नियोजित स्थळी झेप घेतली नसल्यामुळे ते अरबी समुद्रात कोसळले गेले. या अपयशानंतर इस्रो काही गप्प बसले नाही. इस्रोने तातडीने फेल्युअर ॲनालिसिस कमिटी स्थापन केली. ही कमिटी हे रॉकेट प्रक्षेपण करण्यास का अपयशी ठरले? याची सखोल माहिती गोळा करेल.नेमक्या कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या? हेही कमिटी अभ्यास करेल आणि पुन्हा भविष्यात रॉकेट सोडण्याची निश्चितच तयारी करेल.

पीएसएलव्ही सी-61 ही मोहीम यशस्वी झाली असती तर-If the PSLV C-61 mission had been successful

इस्रोने 18 मे 2025 रोजी पी एस एल व्ही सी- 61 ही मोहीम हाती घेतली होती. खरे तर ही मोहीम यशस्वी झाली असती तर सीमेवर बारीक लक्ष ठेवता आले असते. पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवता आले असते.त्यामुळे भविष्यात होणारे आतंकवाद्यांचे हल्ले थोपविण्यासाठी मदत झाली असती. दोन देशांच्या सीमांतर्गत घडणाऱ्या घडामोडीची सविस्तर माहिती भारतीय लष्कराला मिळाली असती आणि त्याचा फायदा भारताला म्हणजेच भारतीय लष्कराला चांगल्या प्रकारे झाला असता.

Leave a comment