मुंबई आणि मुंबई उपनगर मिळून बृहन्मुंबई बनते. या बृहनमुंबईचा विचार करता लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात पहिल्या क्रमांकावर असलेले शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते. सध्या मुंबईची लोकसंख्या 2.2 कोटी आहे. अशा या गजबजलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. गजबजलेल्या मुंबईत धावत्या ट्रेनसारखी माणसे पोटापाण्यासाठी धावत असतात. त्यातूनच जिवाला विसावा मिळावा म्हणून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. अशी प्रेक्षणीय स्थळे मुंबईत भरपूर आहेत. त्यांतील काही स्थळांची आपण माहिती करून घेऊया ——
1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय – Chhatrapati Shivaji Maharaj Museum.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून 700 मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज क्स्तुसंग्रहालय आहे. गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय होटेल, घारापुरी (एलिफंटा केव्हज) आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ही ठिकाणे जवळ-जवळ असल्याने एकाच वेळी पाहता येतात. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे मूळ नाव ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम ऑफ वेस्टर्न इंडिया’ असे होते .नोव्हेंबर 1905 रोजी प्रिन्स ऑफ वेल्सने या म्युझिअमची पायाभरणी केली होती. विटेट या इंग्रज इंजिनिअरने या म्युझिअमचे डिझाईन बनवले होते. मुंबईतील प्रमुख नागरिकांनी मिळून ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने या म्युझिअमची स्थापना केली.
या म्युझिअममध्ये छत्रपती शिवरायांचा तत्कालीन अंगरखा आहे. याशिवाय गुप्तकाळ, मौर्य काळ, राष्ट्रकुट काळ, शिवकाळ अशा विविध काळातील कलाकृती आणि वस्तूंचा संचय येथे पाहायला मिळतो.
29 मार्च 2019 रोजी येथे लहान मुलांसाठी खास म्युझियम निर्माण केल्यामुळे अनेक मुलांचा या म्युझिअमकडे ओढा वाढला. प्रत्येकाने हे म्युझिअम अगदी सावकाशपणे किमान दोन तास पाहावे असेच हे म्युझिअम आहे.
2. जुहू. चौपाटी: Juhu Beach
गेट वे ऑफ इंडियापासून 23 किलोमीटर अंतरावर जुहू चौपाटी आहे. मुंबईतील ही एक प्रसिद्ध चौपाटी असून या चौपाटीला अनेक देशोदेशीचे पर्यटक, सिने क्षेत्रातील कलाकार भेट द्यायला येतात. मुंबईतील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वांत लांब चौपाटी अशी या चौपाटीची ख्याती आहे. ही चौपाटी जवळजवळ सहा किलोमीटर लांबीची आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी या चौपाटीवर प्रचंड गर्दी असते. या चौपाटीवरून सूर्यास्ताचे दृश्य टिपण्यासाठी अनेक लोक या चौपाटीवर येतात.
मे ते ऑगस्ट हे चार महिने वगळता इतर वेळी जुहू चौपाटीचा आनंद लुटता येतो. निरभ्र आकाश आणि थंडगार हवेत जुहू चौपाटीवर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
जुहू बीच जवळच इस्कॉन मंदिर आहे. हे मंदिर एक अध्यात्मिक सेंटर आहे. या बीचजवळच पृथ्वी थिएटर आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या नावाने त्यांचा मुलगा शशी कपूर याने काढलेले हे थिएटर आहे. येथे जवळच सिद्धिविनायक मंदिर आहे. जुहू बीचच्या जवळ असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे शांताक्रूज रेल्वे टेशन होय. येथून जुहूला जाता येते हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्ह्यात येते.
3. हाजी अली दरगाह : Haji Ali Daragah
हाजी अली हा दरगाह मुंबईतील वरळी परिसरात असून हा दरगाह समुद्रकिनाऱ्याजवळच आहे. सय्यद पीर हाजी अली शाह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार समुद्र किनारी हा दरगाह (मशिद) इ.स. 1431 मध्ये बांधलेला आहे. जवळ जवळ सहाशे वर्षांपूर्वी बांधलेला हा दर्जा आजही सुस्थितीत असून मुस्लिम बांधव येथे नित्यनेमाने नमाज पडण्यासाठी येतात. या दर्ग्यात जाण्यासाठी बऱ्याच वेळा छोट्या नौकांचा उपयोग केला जातो.
4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई: Sanjay Gandhi National Park Mumbai
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षण असते ते प्राणिसंग्रहालय पाहण्याचे. मुंबईतील बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान संजय गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1969 साली स्थापन झाले असून या उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे 87 चौरस किलोमीटर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी राखीव असले तरी या उद्यानात अस्वल ,नीलगाय, सांबर, तेंदुआ, हाइना, चिंकारा, गिधाड, हरिण, जंगली मांजर असे कितीतरी इतर प्राणी आहेत. येथील कान्हेरी लेणी प्रसिद्ध आहेत.बौद्ध परंपरेचा वारसा जपणाऱ्या या कान्हेरी लेण्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि सिंगापोर, मलेशिया, थायलंड या देशांत मी पाहिलेली राष्ट्रीय उद्याने यांत खूप मोठा फरक आहे. तेथे प्राण्यांची खूप काळजी घेतात. निगा राखतात. त्यामुळे तेथील प्राणी सतेज, निरोगी आणि नैसर्गिक जंगलात वावर असल्याप्रमाणे वावरतात. भारतात असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.
5.) हँगिंग गार्डन Hanging Garden, Mumbai
मुंबईतील फिरोजशहा मेहता गार्डनलाच हँगिंग गार्डन असे म्हटले जाते. ही गार्डन हँगिंग गार्डन या नावाने इतकी प्रसिध्द झाली आहे की या बागेचे मूळ नाव (फिरोजशहा मेहता गार्डन) लोक विसरुन गेलेत. या बागेत एक शू हाऊस आहे. हे शू हाऊस म्हातारीचे बूट या नावाने प्रसिद्ध आहे. या बागेत एक सूर्य घड्याळ आहे. सूर्याच्या गतिमानाप्रमाणे हे घड्याळातील काटे फिरतात. सूर्य डोक्यावर आला की या घड्याळात 12:00 वाजलेले असतात.
1881 साली स्थापन आलेली ही हँगिंग गार्डन खूप सुंदर आहे. येथील शॉवर्स पाहण्यासारखे आहेत.विविध प्रकारच्या वृक्षांनी ही बाग नटलेली आहे. जागोजागी लॉनही आहेत.
6. दादासाहेब फाळके चित्रनगरी; Dadasaheb Phalake Filmcity, Mumbai
चित्रपट सृष्टीत दादासाहेब फाळके यांना सर्वोच्च स्थान आहे. 1913 साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रसिद्ध केला. तो मूकपट होता. त्यानंतर भारतीय सिनेमासृष्टीत क्रांती झाली. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक हा मान दादासाहेब फाळके यांना जातो,म्हणूनच दादासाहेब फाळके यांच्या नावाने मुंबईत चित्रनगरी उभारली आहे.मुंबईतील गोरेगावात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच दादासाहेब फाळक चित्रनगरी उभारलेली आहे. या चित्रनगरीत एकात्मिक फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. येथे अनेक रेकॉर्डिंग रुम्स आहेत. अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे शुटींग येथे होते. येथे तलाव, बाग, शुटींग बंगले सर्वकाही तयार आहे.
चित्रपट उद्योगाला प्रेरणा आणि चालना देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने 1977 साली सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके यांच्या नावाने ही चित्रनगरी उभारली आहे. सन 2001 साली या चित्रनगरीला दादासाहेब फाळके यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान लक्षात होऊन ‘दादासाहेब फाळके चित्रकारी असे नामकरण करण्यात आले. ही चित्रनगरी 520 एकरात उभारली असून येथे मानवनिर्मित धबधबे सुद्धा निमीण केले आहेत.
7. मरीन ड्राइव्ह Marine Drive Mumbai
मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस रोडवर मरीन ड्राइव्ह बीच आहे. तीन किलोमीटर लांबीच्या बीचवर अनेक सिनेमांचे शुटिंग झाले आहे. या बीचला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले असल्याने मुंबईत आलेला प्रत्येक पर्यटक मरीन ड्राईव्ह बीच पाहून जातोच.
तुम्ही सिटी दूर बसमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला हमखास मरीन ड्राइव्ह बीच दाखवला जातो. या बीचच्या किनाऱ्यावर दिसणार्या सुंदर आणि टोलेजंग इमारती या धनिकांच्या ( श्रीमंतांच्या) आहेत.
तुम्ही मरीम ड्राइव्ह बीच आवश्य पाहा आणि पर्यटनाचा आनंद लुटा..
आवर्जून वाचावे असे काही
- मुंबईः एक पर्यटन स्थळ / Elephanta caves
- दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort
- राष्ट्रपतीभवन: दिल्ली Rashtrapati Bhavan Delhi