छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी नाथसागराच्या पायथ्याला वसलेले प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले गाव म्हणजे Paithan होय. या पैठण गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे. धरणाच्या पायथ्याला म्हैसूरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती केली आहेच.म्हणून या बागेला प्रतिवृंदावन गार्डन म्हणतात. पैठणमध्ये संत एकनाथ यांची समाधी आहे. पैठणी शालू जगप्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पैठणला भेट दिली होती. या सर्व ठिकाणांची माहिती आपण सविस्तर घेणार आहोत.
पैठणला कसे जायचे ? How to go to see Paithan?
पैठण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. छत्रपती संभाजी नगरपासून 50 से 55 किलोमीटर अंतरावर पैठण आहे. छत्रपती संभाजी नगर चालून बसेस जातात.
* अहिल्यादेवी नगर पासून पैठण 168 किलोमीटर अंतरावर आहे.
* आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान, आपेगावापासून पैठण 14 किलोमीटर अंतरावर आहे.
* शनिशिंगणापूर पासून पैठण हे ठिकाण 66 किलोमीटर अंतरावर आहे.
शिर्डी या साईबाबांच्या वास्तव्य गावापासून पैठण 141किलोमीटर अंतरावर आहे.
* बीडपासून पैठण 100 किलोमीटर अंतरावर आहे.
पैठणचा इतिहास आणि जुने नाव: History and old Name Of Paithan:
सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या व तिसऱ्या शतकात सातवाहन घराणे उदयास आले. सम्राट अशोकाच्या काळात सातवाहन राजघराणे अशोकाचे मांडलिक होते. त्यानंतर पुढे त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या प्रदेशात सुमारे साडेचारशे वर्षे सातवाहन राजघराण्यांनी आपली सत्ता गाजवली होती. प्रतिष्ठान हे सातवाहन राजघराण्याची राजधानीचे शहर होते. प्रतिष्ठान हेच पैठणीचे जुने नाव होय. म्हणूनच पैठणीला खूप मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. असे म्हटले जाते.
* संत एकनाथाची जन्मभूमी: Birth Place of Sant Eknath.
संत एकनाथ यांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला. म्हणूनच पैठण ही संत एकनाथांची जन्मभूमी असे म्हटले जाते. संत एकनाथांची आई रुक्मिणी व वडील सूर्यनारायण हे संत एकनाथ लहान असतानाच वारले. दौलताबाद किल्ल्याचे जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु होते. गिरिजाबाई ही एकनाथांची पत्नी होती. लहानपणापासूनच त्यांचा कल आध्यात्मवादाकडे होता. त्यामुळे त्यांच्या हातून ‘भागवत’ या प्रसिद्ध ग्रंथाची निर्मिती झाली. संत एकनाथांची भारूडे खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत .संत एकनाथ स्पृश्य-अस्पृश्य मानत नसत. जातिभेद मानत नसत. यांनी आपल्या ग्रंथातून आणि भारुडांतून समतेची शिकवण दिली. कर्मकांड, अंधश्रद्धा भ्रामक पौराणिक कथांना त्यांनी कडाडून विरोध केला. संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचे एकनाथांनीच शुद्धीकरण केले. ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. पैठणीत संत एकनाथांचे मंदिर आहे. या मंदिरात नित्य नेमाने पारायण होते. संत एकनाथांचा मृत्यू 1599 मध्ये पैठणीतच झाला.
• जायकवाडी धरण: Jayakwadi Dam.
पैठण या ऐतिहासिक ठिकाणापासून जायकवाडी धरण 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी वाहने पार्किंग करून जायकवाडी धरण पाहायला जाता येते. या जायकवाडी धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण मातीचे असून हे भारतातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे.
गोदावरी नदीचे पाणी अडवून बांधलेल्या या विशाल जायकवाडी धरणाची पाणी धारण करण्याची क्षमता 102 TMC ची आहे. पावसाळ्यात जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले तर या धरणातील पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी दोन वर्षे तरी पुरते. तब्बल दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र गोदावरी धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आलेले आहे. या धरणाची लांबी 60 किलोमीटर असून रुंदी 10 किलोमीटर आहे. या धरणाची मध्यवर्ती उंची 41 मीटर आहे. 1965 साली या धरणाचे बांधकाम सुरु झाले.तब्बल 11वर्षानी धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन पाणी साठण्यास सुरुवात झाली. धरणाचा पाणीसाठा पाहिला तर एखाद्या छोट्या समुद्रासारखा वाटतो. या पाणीसाठ्याला ‘नाथ सागर असे नाव देऊन संत एकनाथ यांचा उद्धार केला आहे.
संत ज्ञानेश्वर उद्यान : Sant Dnyaneshwar Garden:
पैठण पासून 2.5 किलोमीटर अंतरावर संत ज्ञानेश्वर उद्यान आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी सुमारे 124 हेक्टर परिसरात पसरलेले हे उद्यान ‘प्रति वृंदावन गार्डन’ म्हणून ओळखले जाते. या उद्यानाला संत ज्ञानेश्खर उद्यान असे नाव दिले आहे. पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानाला ज्ञानेश्वर यांचे नाव देण्याचे कारण म्हणजे, पैठण आणि ज्ञानेश्वर यांचे एक नाते आहे. पैठणपासून 14 किलोमीटर अंतरावर संत ज्ञानेश्वर यांचे आपेगाव ते जन्म स्थळ आहे. तसेच पैठणला एकदा पंडिंतांची सभा भरली होती. त्यावेळी ज्ञानेश्वर तेथे दीक्षा घेण्यास आले होते. परंतु संन्याशाची पोरे म्हणून त्या चारही भावांना दीक्षा देण्यास नाकारले; पण ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाने सभा जिंकली. शेवटी निवृत्ती नाथांना गुरु मानून ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली.
हे कलात्मक उद्यान पाहण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता येणे सर्वांत उत्तम वेळ आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी बागेतील वेगवेगळ्या फुलझाडांची, इतर झाडांची, बागेच्या कलात्मक रचनेची पाहणी करायची, सौंदर्य नगरीचा मनमुराद आनंद घ्यायचा आणि अंधार पडला की कारंजे शो’ असतो. हा शो पाहायचा. कारंजांचे थुईथुई नाचणे, रंगीबेरंगी प्रकाशाचे खेळ पाहून मन उत्साही होते.डोळे नक्कीच तृप्त होतील.
पैठणी शालूचे केंद्र: Centre of Paithani:
पैठण हे भाव जसे ऐतिहासिक वारसा जपणारे आहे,तसे प्रतिष्ठान हे या गावाचे ऐतिहासिक नाव आहे.याच गावात पैठणी शालू करण्याचा पारंपरिक व्यवसाय आजही चालू आहे. या गावातील पैठणी शालूला-संपूर्ण भारतभर मागणी आहे.
मला पैठण हे गाव दोन वेळा पाहण्याचा योग आला. 1982/83 च्या दरम्यान आम्ही सोळा-सतरा वर्षांचे सर्व मित्रमंडळी औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, पैठण पाहायला गेलो होते. त्या वेळी आणि शिक्षकांच्या अधिवेशनाच्या वेळी 1992/92 साली सर्व शिक्षक स्पेशल बस भाड्याने घेऊन गेलो होतो. यावेळी पैठणीच्या शालू तयार करणाऱ्या केंद्रात भेट देण्याचा योग आला. तेथील हातमागावर शालू कसा तयार होतो, हे तेथील कामगारांनी प्रवास आम्हाला दाखवले. अप्रतिम सौंदर्य आणि मुलायमपणासाठी येथील शालू खूप प्रसिद्ध आहेत. 1992/93 च्या दरम्यान येथे 3000 पासून 75000 पर्यंतचे शालू बनवले जात होते.
तेथील खूप सुंदर शालू पाहून आम्हाला खरेदी करायची इच्छा झाली होती. त्यावेळी 1000 से 1200 के मासिक पगार होता. मनपसंद साडी घेण्यासाठी किमान 5000 रु. हवे होते. पण हे आमच्या खिशाला परवडणारे नसल्यामुळे आमच्या वेळी कुणीच साडी खरेदी केली नाही.
आम्ही पैठणीला गेलो होतो, त्यावेळी कोणी तरी कोल्हापूरुच्या अंबाबाईसाठी दीड लाख रुपयांची साडी बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. ही साडी आम्ही पाहायला गेलो होतो. सोन्याचे जर (धागे) वापरून उत्तम प्रकारे बनवलेली साडी पाहून आमचे डोळे विस्फारून गेले होते. दीड लाख रुपये म्हणजे आमचे 125 महिन्यांचे पगार .
नाथ समाधी: Nath Samadhi
संत एकनाथांचा जन्म पैठणीत झाला आणि मृत्यूही पैठणीतच झाला. त्यांचा मृत्यू खूप विचित्र पद्धतीने झाला. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी गोदावरी नदीत उड़ी घेऊन जलसमाधी घेतली. सतांनी उडी घेतली म्हणून आपण जलसमाधी म्हणतो, सर्व सामान्य व्यक्तीने घेतलेल्या उडीला आत्महत्या म्हणतात.असो. त्यावेळेच्या त्यांच्या मानसिक स्थितीमुळे घडलेली ही घटना आहे. म्हणून त्यांचे कार्य आपणाला विसरून चालणार नाही. पैठणच्या ग्रामस्थांनी याच गोदावरी नदीच्या काठी पैठण येथे संत एकनाथांची समाधी बांधलेली आहे.
जलविद्युत केंद्र
पैठण येथे गोदावरी नदीच्या काठावर बांधलेल्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी वीज निर्मिती केली जाते. शेतीला आणि पिण्यासाठी पाणी सोडल्यावर ते पाणी जलविद्युत केंद्राच्या टर्बाईनमधून येते. त्यामुळे वीज निर्मिती होते. हे जलविद्युत केंद्र उन्हाळ्यात धरणाचे पाणी कमी झाल्यावर बंद असते.