तुळजाभवानी मंदिर तुळजापूर / Tulja Bhavani Temple

महाराष्ट्राची कुलदेवता, सर्वांचे शक्तिस्थान आणि श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूरची Tulja Bhavani होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी होय. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आहे. या तुळजापूर बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

तुळजा भवानी कोण आहे ? Who is Tulja Bhavani?

तुळजापूरची तुळजा भवानी ही महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे.कुलस्वामिनी आहे.छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याची कुलदैवत आहे. तुळजा भवानीला अंबा, जगदंबा, भवानी, गौरी या अशा अनेक नावांनी संबोधतात. ही सर्व नावे पार्वतीशी संबंधित आहेत. म्हणजेच पार्वतीचे प्रतिकात्मक रूप म्हणजे तुळजाभवानी होय. शिव आणि पार्वती यांचे विचार भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. म्हणूनच त्यांची वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने आराधना केली जाते.

साडे तीन शक्तीपीठ: Sadetin Shaktipith.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तीपीठे या नावाने ओळखले जाते. या सर्व स्त्री देवता आहेत आणि त्या पार्वतीच्या प्रतिकात्मक शाखा आहेत. या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी बद्‌द‌ल आपण माहिती घेणार आहोत.

तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? Where is Tulja Bhavani Tample?

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानीचे मंदिर हे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर या गावात आहे. तुळजाभवानीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे मानले गेल्यामुळे तुळजा- भवानीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन अनेक भाविक तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात.

तुळजापूरला कसे जायचे? How to go to see Tulja Bhavani?

* कोल्हापूरहून तुळजापूरला जाता येते. कोल्हापूरहून तुळजापूर 283 किलोमीटर अंतर आहे. खासगी फोर व्हीलरने जात असाल तर 5 तास वेळ लागेल.

* तुम्ही पंढरपूरला आला असेल तर पंढरपूर ते तुळजापूर 113 किलोमीटर अंतर आहे. पंढरपूर पासून 2 तासांचा प्रवास आहे.

सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून तुळजापूर केवळ 46 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापासून तुळजापूरचा प्रवास एक तासाचा आहे

धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून तुळजापूर केवळ 21 किलोमीटर अंतरावर आहे.

तुळजा भवानीचा इतिहास: History of Tulja Bhavani:

तुळजाभवानी मंदिराचा इतिहास खूप प्राचीन असला तरी सध्या जे मंदिर आहे, त्या मंदिराचा बराचसा भाग हेमाडपंथी आहे. यावरून हे मंदिर इ स दहाव्या, अकराव्या शतकात बांधलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतराव्या शतकात स्वराज्याची निर्मिती केली. तेव्हापासून तुळजा भवानीचे महत्त्व अधिकच वाढत गेले. याचे कार‌ण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुळाची तुळजाभवानी कुलदेवता आहे. आणि दुसरे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे.

कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur

तुळजापूर हे शहर धाराशिव जिल्ह्यात येते .बाला घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या याच तुळजापूरात राष्ट्रकुट, यादव काळात तुळजाभवानीचे मंदिर बांधले गेले.

इ.स. 1659 साली महाराष्ट्रावर अफजलखानाच्या रुपाने मोठे संकट आले होते . अफजलखान शिवरायांचा बिमोड करण्यासाठी आला होता. त्यावेळी पंढरपूर, तुळजापूर परिसरातील पिकांचे, शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते. स्त्रियांच्या अब्रू लुटल्या जात होत्या. जेणेकरून शिवाजी गडावरून खाली उतरून आपल्याशी लढेल आणि मग त्याला पकडता येईल. हा हेतू अफजलखानाचा होता. अफजलखानाचा हा हेतू साध्य झाला तर नाहीच, उलट तोच शिवाजीच्या जाळ्यात अडकला. आणि अफजलखानाचा बिमोड झाला.

विजापूरच्या अफजलखारावर असा आरोप लावला जात आहे की त्याने पंढरपूर, तुळजापूरची मंदिरे त्याने उध्वस्त केली, मूर्तीचे नुकसान केले; पण या घटनेला कोणताही लेखी पुरावा नाही. आणखी एक बाब म्हणजे अफजलखानाच्या फौजेत अनेक हिंदू लोक होते. महाराष्ट्रातील काही इनामदार अफजलखानाला फितूर झाले होते. कृष्णाजी भास्कर (कुलकर्णी) हा अफजलखानाचा वकील होता. अफजलखानाने हिंदूंच्या देवळाला हात लावला असता तर ही सर्व मंडळी दुखावली असती. त्यामुळे अफजलखान असे काही धाडस करणे अशक्य होते. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर शिवपूर्वकाळातील आहे. शिवकाळा नंतरही काही प्रमाणात मंदिराच्या काही भागाची पुनर्बांधणी केली.

तुळजाभवानी मंदिराची रचना व वैशिष्ट्य: Construction and Feature of Tulja Bhavani:

राष्ट्रकूट – शिलाहार- यादव काळापासून अस्तित्वात असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिराची रचना कशी आहे, याबद्द‌ल आपण थोडी माहिती घेऊया. तुळ‌जाभवानीच्या मंदिराला मुख्य प्रवेशद्वार आहे.हे प्रवेशद्वार सुशोभित, नक्षीदार, काळ्या बेसॉल्ट दगडांनी बनलेले आहे. या प्रवेशद्वाराला शहाजी महाद्वार असे नाव दिले आहे. मंदिराला दुसरा एक दरवाजा आहे. त्याला जिजाऊ महाद्वार असे नाव दिले आहे. या प्रवेशद्वरांच्या नावावरून छत्रपती घराण्याची तुळजा भवानीवर आणि रयतेची छत्रपती घराण्यावर किती श्रद्धा होती आणि आहे, याचा हा सबळ पुरावा आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिर परिसरातच विविध मंदिरे आहेत विनायक मंदिर, अन्नपूर्णा देवीचे मंदिर, आदिशक्ती देवीचे मंदिर, खंडोबा मंदिर, दत्तमंदिर, यमाई‌ देवीचे मंदिर, मातंगी देवीचे मंदिर अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.मंदिराची प्रदक्षिणा घालताना या सर्व मंदिरांचे दर्शन घडते.

ही सर्व छोटी छोटी मंदिरे पाहून आता आपल्याला तुळजा भवानीचे मंदिर पाहायचे आहे. गंमत अशी की तुळजापूर या गावाचे पूर्वीचे नाव चिंचपूर असे होते. या गावच्या परिसरात भरपूर प्रमाणात चिंचा होत्या. म्हणजे चिंचेची झाडे होती. म्हणूनच या गावाला चिंचपूर असे नाव पडले होते. पुढे तुळजाभवानीवरून तुळजापूर असे नाव पडले.

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातील दरवाजाला चांदीच्या पत्र्याचा मुलामा दिला आहे. चांदीच्या मुलाम्यावर खूप छान नक्षी काढली आहे. मंदिराच्या गर्भगृहात तीन फूट उंचीची काळ्या कुळकुळीत दगडापासून बनवलेली तुळजाभवानीची मूर्ती आहे. ही मूर्ती नमस्कार स्वयंभू आहे.अष्टभूजाकृती ही मूर्ती आहे. अर्थात तिला म्हणजे तुळजा भवानीला आठ हात नव्हते.हे देवीच्या पराक्र‌माचे आणि कर्तृ‌वाचे प्रतिकात्मक रूप आहे. देवीने उजव्या पायाखाली महिषासुराला घेतले असून त्याच्या छानिवर त्रिशूळ रोखले आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानीचे आणखी एक वैशिष्ट्य आणि वेगळेपणा म्हणजे उत्सवाच्या वेळी देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीची मिरवणूक न काढता, प्रत्यक्ष गर्भगृहातील देवीची मूळ मूर्ती तीन वेळा उचलून पलंगावर ठेवली जाते. नंतर तीच मूर्ती पालखीत घालून मिरवणूक काढली जाते. ही आगळी वेगळी प्रथा परत तुळजापुरातच आहे.

दसरा उत्सव: Dussehra Festival:

तुळजापूरच्या तुळजाभवानीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे दसरा उत्सव होय. दसऱ्याला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात. हा उत्सव घटस्थापनेपासून विजया दशमीपर्यंत असतो. नवव्या दिवशी देवीचा जागर असतो. नवीन प्रथे- नुसार देवीला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.

एक दिवस तुळजापूरला आवश्य भेद द्या. मी भेट दिली आहे. कर्मकांडाला प्राधान्य न देता देवी तुळजाभवानीचे दर्शन आवश्य घ्या.

आवर्जून वाचावे असे काही

  1. कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur
  2. कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे /Places to visit in kolhapur

Leave a comment