पुण्याचा लाल महाल: Lal Mahal Pune

छत्रपती शिवाजी महाराजांचे एके काळचे निवासस्थान.ज्या ठिकाणी शिवरायांनी राज्य कारभाराचे घडे घेतलेले, ते ठिकाण म्ह‌णजे Lal Mahal होय. पुणे, सुपे, चाकण या सुभ्यांची सुभेदारी निजामशाहने आणि नंतर आदिलशाहने शहाजी राजे यांना दिली होती. म्हणून शहाजी राजांनी आणि जिजामातेने राज्यकार‌भाराचे धडे शिकवण्यासाठी लाल महालाची निवड केली होती. तोच Lal Mahal कोणी बांधला? आता त्याचे अस्तित्व कुठे आहे? काय आहे या लाल महालाचा इतिहास ? हे सर्व प्रश्नांची जाणून घेण्यासाठी आपण पुण्याच्या लाल महालाची माहिती घेणार आहोत.

लालमहाल कुठे आहे? Where is Lal Mahal?

छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य ज्या महालात होते, तो महाल म्हणजे लाल महाल होय.हा लाल महाल शहाजी राजांनी कसबा पुणे येथे बांधला होता. त्यावेळचे पुनवडी म्हणजे आता अस्तित्वात असलेले पुणे होय. सध्या पुण्यात अस्तित्वात असलेला लाल महाल हा लाल महाल नसून लाल महालाची प्रतिकृती आहे. हा लाल महाल सध्या शनिवार वाड्याच्या जवळ आहे.

लाल महाल पाहायला कसे जायचे ? How to go to see Lal Mahal?

1.लाल महाल पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यातून स्वारगेट पासून लाल महाल उत्तरेच्या दिशेला 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथून कॅबने लाल महाल पाहायला जाता येते.

2. मोशीतून दक्षिणेला 23 किलोमीटर अंतरावर लाल महाल आहे. येथूनही कॅबने लाल महाल पाहायला जाता येते.

3. पिंपरी-चिंचवड बस स्थानकापासून 16 किलोमीटर अंतरावर लाल महाल आहे.

4. पुण्याच्या शनिवार वाड्यापासून लाल महाल 500 मीटर अंतरावर आहे. शनिवारवाडा, लाल महाल, भिडे वाडा हे एकाच वेळी पाहता येतात .ते एकाच ठिकाणी जवळ-जवळ आहेत. आजही अनेक पर्यटक लाल महाल पाहायला येतात.

शनिवार वाडाः पुणे: Shaniwar wada Pune

पुनवडी ते पुणे : Punawadi to Pune:

सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे या शहराचा इतिहास खूप मोठा आहे. इ सन आठव्या शतकात या शहराला पुन्नक असे नाव होते. इ. स. दहाव्या शतकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात राहण्यापूर्वी ‘पुनवडी’ असे झाले. पुढे सतराव्या, शत‌काच्या सुरुवातीला ‘कसबा पुणे’ असे नाव झाले. शहाजीराजे यांनी पुण्यात शिवबाचे बस्तान बसण्यास‌ाठी एक वाडा बांधला. या वाड्याला लाल रंगाचा चिरा वापरला होता. म्हणून या वाड्याला लाल महाल असे नाव दिले. यावेळी पुणे विस्तारले होते. जेथे वाडा बांधला ते ठिकाण आणि सभोवतालचा परिसर म्हणजे कसबा पुणे होय. पुणे विस्तारल्यावर या कसबा पुणे चे कसबा पेठ असे नाव पडले .आणि संपूर्ण नगराला पुणे असे नाव पडले. इंग्र‌जांच्या राजवटीत पुणे चे पुणा झाले. इंग्रज गेल्यावर पुन्हा पुणाचे पुणे झाले. सध्या बांधलेल्या लाल महालाच्या प्रतिकृतीची इमारत कसबा पेठेत म्हणजे मूळे कसबा पुण्यात आहे. याच लाल महालाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत –

लाल महाल कोणी बांधला ? Who buit Lal Mahal?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यावेळी लाल महाल बांधला नव्हता. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला होता शहाजीराजे आणि जिजामाता यांच्यात अनेकदा स्वराज्या बद्‌दल चर्चा होत असे. त्यातूनच पुणे, सुपे, चाकणचा सुभा सांभाळण्याच्या निमित्ताने शहाजीराजे यांनी जिजामाता आणि शिवबा यांना पुण्याला पाठवले. 1640 च्या दर‌म्यान शिवबा आणि जिजामाता पुण्यात आले. त्यापूर्वी शहाजी राजांना 1635 च्या दरम्यान दादोजी कोंडदे‌वला पुण्याला पाठवून तेथे वाडा बांधून घेण्याचा आदेश दिला. शहाजीराच्या आज्ञेनुसार दादोजी कोंडदे‌वने 1636 मध्ये कसबा पुण्यातील झांबरे-पाटील यांची जमीन खरेदी करून त्या जागेत वाडा बांधून घेतला. यावेळी वाडा बांधण्यास साधारणतः 16000 रुपये खर्च आला होता. 1637/38 ला वाडा बांधून पूर्ण झाला होता. जिजामाता आणि शिवबा 1640 साली पुण्यात आले आणि पुण्यातील लाल महालात राहू लागले.

शिवरायांचे लाल महालात वास्तव्य: Shivaji’s Recidecne in Lal Mahal..

इ.स. 1640 च्या दरम्यान जिजाऊ आणि शिवबा पुण्यात लाल महालात राहायला आले. त्यावेळी पुण्याची परिस्थिती भयंकर होती. चोऱ्या होत होत्या. कोल्ह्या- कुत्रांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. पुंड‌शाही वाढली होती. आपलेच लोक स्त्रियांची अब्रू लुटत होते. जिजामातेने या सर्व गोष्टींवर आळा घातला. चोरांना पकडून त्यांना शिक्षा दिली. स्त्रियांच्या अब्रू लुटणाऱ्याला कडक शासन केले. शेतीचे नुकसान होत असल्याने कोणी शेती करण्यास धजत नव्हते. गरिबी, उपासमारी वाढली होती. अशा परिस्थितीत जिजामातेने खंबीर पावले उचलून शिवाच्या हस्ते पुण्याच्या शेतवाडीत सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांना धीर दिला. बियाणे पुरवले. त्यामुळे पुण्याचे वातावरण हळूहळू बदलू लागले.

शिवराय पुण्यात असतानाच तोरणा किल्ला, राजगड हे किल्ले इ.स. 1646 साली स्वराज्यात घेतले. त्यांची दुरुस्ती केली. 1650 साली शिवराय राजगडावर राहायला गेले. आणि तेथूनच राज्य कारभार करू लागले म्हणजेच 1640 ते 1650 पर्यंत शिवराय आणि जिजामाता यांचे वास्तव्य पुण्यातील लाल महालात होते.

जून 1660 साली औरंगजेबचा मामा शाहिस्ताखान 40000 फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला होता. पुरंदर घेऊन तो पुण्यात लाल महालात येऊन राहू लागला. त्यावेळी जिजामाता राजगडावर होत्या, तर शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. शिवाय पन्हाळगडावरून सुटका करून पुन्हा राजगडावर आले. गडावरून त्यांनी आपला मुक्काम सिंहगडला हलवला अणि तेथून खलबते सुरु केली.

सिंह‌गडावर आल्यावर शिवरायांनी लाल महालातील खडा न् खडा माहिती घेतली होती. खानावर छापा टाकायचा याचे नियोजन करण्यात आले. त्यापूर्वी शिवाजी आपल्याकडे येत नाही .तो घाबरला आहे. असे वातावरण करण्याचे काम बहिर्जी नाईकने उत्तमपणे बजावले होते. त्यामुळे खान सुस्त होता. बेसावध होता.

लाल महालावर छापा: Shivaji’s Raid On Red Mahal

शिवरायांनी नियोजनाप्रमाणे 5 एप्रिल 1663 रोजी नियोजना प्रमाणे छापा टाकण्याचे ठरले. त्यावेळी कसबा पेठेत एक लग्न होते. तो रमजानचा चौथा दिवस होता. शिवरायांनी काही माणसे कात्रजच्या घाटात अगोदरच ‌ पाठवली होती. महालावर छापा टाकण्यासाठी शिवराय स्वतः आपल्या निवडक सवंगड्यासह पुण्याच्या दिशेने चालले. पुण्यात आल्यावर ते घरातीत घुसले. वराती करांना त्याची पूर्व कल्पना होती. अंधाराचा आणि वरातीचा फायदा घेऊन शिवराय आणि त्यांचे सवंगडी लाल महालाच्या पाठीमागून आत घुसण्यासाठी गेले. शिवरायांना लाल महालाचा खडा न् खडा माहिती अस‌ल्यामुळे भिंतीला कुठे बोगदा पाडायचा ? हे त्यांना माहिती होते भिंतीला बोगदा पाडून शिवराय सवंगड्यांसह लाल महालात घुसले. मंद प्रकाशात काय चालले आहे? कोण कोणाला कापतो आहे? काहीच कळत नव्हते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खान आणि जनानखाना सगळेच गोंधळून गेलेत. शिवराय खानावर वार करणार इतक्यात खानाने खिडकीतून उडी मारली. खिडकीतून उडी मारता मारता खानाची बोटे छाटली गेली. पाठलाग करण्याइत‌का वेळ नव्हता. खानाचे सैन्य तयार होण्यापूर्वी शिवराय जाणि सवंगडी महालातून पसार झाले त्यावेळी पुण्यातील लोक म्हणू लागले —-

“खानाच्या जिवावर आले होते; पण बोटाबर निभावले”

इकडे कात्रज घाटात बैलांच्या शिंगाना मशाली बांधून त्या पेटविल्यामुळे शिवाजी कात्रजच्या दिशेने गेला,असे समजून खानाच्या सैन्याने कात्रजच्या दिशेने पाठलाग केला; पण शेवटी शिवरायांनी खानाच्या सैन्याला कात्रजचा घाट दाखवला. शिवरायांचा बेत यशस्वी झाला. शाहिस्ताखान पुणे सोडून गेला.

लाल महालाची प्रतिकृती: A Replica of Red Mahal

सध्या पुण्यातील लाल महालाची प्रतिकृती (Replica) 1988 साली पुणे महानगर पालिकेने बांधली आहे. महाल छोटासाच पण नीटनेटका आहे .महालात प्रवेश केल्यावर आपल्याला शिवबा आणि जिजामाता सोन्याचा नांगर चालवत असल्याचे शिल्प आहे. पुण्यातील या लाल महालाची प्रतिकृती आवश्य पाहून यावे. शिवरायांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची निश्चितच उजळणी होईल.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Dehu Temple
  2. Shaniwar wada Pune

1 thought on “पुण्याचा लाल महाल: Lal Mahal Pune”

Leave a comment