साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
गॅब्रिएला मिस्राल
Gabriela Mistral
जन्म: 7 एप्रिल 1889
मृत्यू : 10 जानेवारी 1957
राष्ट्रीयत्व : चिलीयन
पुरस्कार वर्ष: 1945
गॅब्रिएला मिस्राल या चिली देशाच्या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे खरे नाव लुसीला गोडाय असे होते. त्यांनी चिली कवितांना आधुनिकतेचा साज चढवला होता. त्यांच्या कवितांमधून लहान मुले आणि दलित यांचे दुःख व्यक्त होत होते. त्यांचे प्रतिभासंपन्न लेखन आणि कवितांमधून हाताळलेले उपेक्षितांचे अंतरंग यामुळे त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.