प्रचंड प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Globle warming) यांमुळे थंड आणि शुद्ध हवेच्या ठिकाणांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील ससाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भरपूर थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील महत्त्वाच्या थंड हवेच्या ठिकाणांचा आपण परिचय करून देणार आहोत.
(A) Mahabaleshwar Pachgani महाबळेश्वर-पाचगणी
महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन छोटी नगरे वसलेले पठार सह्याद्री पर्वतातच आहे. महाबळेश्वरच्या पठारावरील उन्हाळ्यातील हवा उबदार, आल्हाददायक, स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यात भरपूर आणि शुद्ध हवेचा पुरवठा देणारे हे पठार ब्रिटिश काळापासूनच प्रसिद्ध आहे. याच पठारावर पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे आहे. प्रतापगड आहे. शिवरायांना स्वराज्यासाठी योगदान देणारे मावळे याच परिसरातील होते. महाबळेश्वरला आल्यावर आपल्याला अनेक प्रसिद्ध स्थळे पाहता येतात. प्रतापगड, मुंबई सनसेट पॉईट, महाबळेश्वर हिल स्टेशन, मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक बोटिंग, हिंगमळा वॉटरफॉल कृष्णाबाई मंदिर, पाचगणी, भिलार एलिफंट हेड, असे कितीत पॉईड पाहता येतात.
सातारा या जिल्हयाच्या ठिकाणाहून पश्चिमेला-वायव्येला 54 किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर आहे. वाई पासून महाबळेश्वर 33 किलोमीटर अंतरावर आहे महाबळेवरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे.
(B) Matheran माथेरान:
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान हे प्रसिद्ध ठिकाण आहे. माथेरान थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. अनेक लोक उन्हाळ्यात हवा पालटण्यासाठी माथेरानला जातात.
मुंबई पासून 110 किलोमीटर अंतरावर असलेले हे माथेरान समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर आहे- पश्चिम घाटातील म्हणजे सह्याद्री पर्वतातील एक महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टनने हे थंड हवेचे ठिकाण विकसित केले होते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक पर्यटक माथेरानचा आनंद लुटण्यासाठी येतात. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक ब्रिटिश लोक माथेरानला येऊन राहत असत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे माथेरानला विशेष संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती सापडतात.
(C) Mhaismal म्हैसमाळ:
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलदाबाद शहराजवळ म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. म्हैसमाळ समुद्र सपाटीपासून सुमारे 1060 मीटर उंचीवर असून पावसाळ्यात हिरवाई, तर उन्हाळ्यात थंडाई या गोष्टीमुळे म्हैसमाळ हे विशेष लोकप्रिय आहे. म्हैसमाळ खुलदाबादपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर पासून 40 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. उन्हाळ्यातील थंड व आल्हाददायक हवेसाठी म्हैसमाळ प्रसिद्ध आहे.
(D) Amboli आंबोली
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले आंबोली हे निसर्गरम्य ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात येते. आंबोली हे पावसाळा आणि उन्हाळ्यातील लोकप्रिय ठिकाण आहे . महाराष्ट्रातील सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची प्रसिद्धी आहे. आंबोलीचा घाट ही प्रसिद्ध आहे. सावंतवाडीतून घाट चढून अर्थात वाहनाने माथ्यावर आले की आंबोलीचा दिमाखदार, निसर्गरम्य परिसर लागतो.गर्द राईमुळे उन्हाळ्यात अनेक पर्यटक आंबोलीत मुक्काम करायला येतात.
पावसाळ्यातील धुके आणि धबधबे पाहायला तर हजारो पर्यटक येतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर वसलेले आंबोली हे ठिकाण कोल्हापूरपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे.
(E)Toranmal Hill station तोरणमाळ.
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. अक्राणी तालुक्यात हे ठिकाण येते.
शहाद्यापासून 30 किलोमीटर अंतरावर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी यशवंत तलाव, कमळ तलाव, सिताखाई पॉईंट, सिताखाई धबधबा, गुहा इत्यादी ठिकाणे पाहायला मिळतात. तोरणमाळला कोणत्याही महिन्यात जाता येते. तेथील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येतो. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचेठिकाण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोरणमाळला भेट द्यायला हरकत नाही.
(F) Bhandardara भंडारदरा
भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येते. भंडारदरा प्रवरा नदीच्या काठी वसलेले असून येथील भंडारदरा धरण प्रसिद्ध आहे. या धरणाच्या पाण्यावर जलविद्युत केंद्र निर्माण केले आहे. अचाट निसर्ग सौंदर्य लाभलेल्या भंडारदरा परिसरात महादेव कोळी जमातीचे लोक अधिक प्रमाणात आढळतात. या धरण परिसरात अनेक निसर्गरम्य धबधबे आहेत. येथील प्रवरा नदीला अमृतवाहिनी असेही म्हणतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात भंडारदरा पाहायला आवश्य जावे असेच हे ठिकाण आहे.
(G) Chikhaldara चिखलदरा
चिखलदरा हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येते. या ठिकाणापासून जवळच मेळघाट हे वाघ अभयारण्य आहे. भारतात वाघांची संख्या कमी होत चालली आहे. महाराष्ट्रात केवळ 400 ते 500 वाघ आहेत. यांतील काही वाघ मेळघाटमध्ये आढळतात. चिखलदरी हे ठिकाण पाहण्यासाठी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात अधिक योग्य आहे.
(H) Panhala पन्हाळा
कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पन्हाळा होय. पन्हाळ्याला दख्खन दुर्ग असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे हा पन्हाळा गड होय. राजा भोज आणि महाराणी ताराबाई यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणजे पन्हाळा होय. पन्हाळा येथील पावनगड मार्गे शिवराय सिद्दीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडला गेले होते.
असे हे पन्हाळा ठिकाण सध्या पर्यटनाचे महत्वपूर्ण ठिकाण आहे. या गडावर बारमाही लोक पर्यटनाला येतात. येथे मुक्कामाची सोय असल्याने मुक्काम करतात. पन्हाळा पाहतात आणि थंडगार हवेचाही आनंद लुटतात.
(I) Lonavla Khandala लोणावळा – खंडाळा :
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली लोणावळा- खंडाळा ही ठिकाणे थंडगार हवेसाठी आणि निसर्गरम्य हवेसाठी प्रसिदध आहेत. लोणावळा आणि खंडाळ्याला लोक पावसाळयात सुद्धा धुक्यात हिंडण्याचा आनंद घेण्यासाठी जातात. तर उन्हाळ्यात आल्हाददायक हवेचा आनंद लुटण्यासाठी जातात . पुण्याहून लोणावळा 70 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळ्याजवळच खंडाळा आहे. दोन्ही ठिकाणे एकाच वेळी पाहता येतात