अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या दिवशी शपथविधी घेतली, त्याच दिवशी म्हणजे 20 जानेवारी 2025 रोजी चीनने आपले एक नवीन app मार्केटमध्ये आणले.
तुम्हाला माहीत आहे का ते app?
अमेरिकेत 20 जानेवारी 2025 रोजी सर्वांत जास्त कोणते app download केले असेल, तर ते म्हणजे deepseek. चीनच्या एका कंपनीने deepseek हे app बाजारात आणले आणि त्याचा पहिला फटका अमेरिकेतील शेअर मार्केटला बसला. अमेरिकन शेअर मार्केटिंगने गेली दहा दिवस नीचांकी पातळी गाठली आहे. अर्थात हाच अनुभव भारतीय शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आला आहे. या deepseek app मुळे गुंतवणुकदार चांगलेच हादरून गेले आहेत. सर्वांत जास्त फटका बसला तो Nvidia कंपनीला! या कंपनीचे शेअर्स सर्वांत जास्त प्रमाणात कोसळले आहेत.
Deepseek हा एक AI वर चालणारा chat-bot असून एका चायनीज कंपनीने तो app मार्केटमध्ये आणलेला आहे.
लियॅग वेनफेंग आणि डीपसीक
deepseek हा chatbot चीनमधील लियॅग वेनफेंग याने निर्माण केला आहे. या app ची निर्मिती करून 40 वर्षांच्या लिसँग वेनफेंगने संपूर्ण जगात चांगलीच खळबळ उडवली आहे. त्याने आपली कंपनी जुलै 2023 मध्ये लाँच केली, या कंपनीचे AI Assistant app हे जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले.
AI आणि AI वर आधारित तंत्रज्ञानासाठी अत्याधुनिक चिप्स हव्यात, असा ट्रेण्ड इंडस्ट्रिजमध्ये असताना लिसँग वेनफेंग याने तुलनेने जुन्या Nvidia A 100 या कंपनीच्या चिप्स वापरल्या. या चिप्स चीनला निर्यात करण्यावर अमेरिकेने आता बंदी घातली आहे. सर्वसाधारणपणे सुमारे 50000 चिप्स वापरून Deep seek लाँच करण्यात आल्याचे संकेत आहेत.
आपली AI models ही इंडस्ट्रीतल्या Chat – GPT च्या तुलनेत त्याच तोडीची असल्याचे वेनफेंग चे म्हणणे आहे. यामुळेच अमेरिकेत खळबळ माजली आहे. Chat – GPT तयार करणाऱ्या Open AI या कंपनीने एकाच वर्षात तब्बल 5 अब्ज डॉलर्स खर्च केलेले आहेत. 2025 मध्ये Meta कंपनी 65 अब्ज डॉलर्स यांत गुंतवणार आहे. Open AI, Google, Anthropic या सारख्या कंपन्यांनी त्यांचे AI-Bot विकसित करण्यात केलेल्या खर्चाच्या तुलनेत अगदी मामुली किंमतीत म्हणजे 60 लाख डॉलर्समध्ये deepseek हे AI Chat-bot विकसित केले आहे.
Deepseek free?
deepseek हे app लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ते app free मध्ये download करून मिळाले. हा chat bot कुणीही download करु शकतो. Chat – GPT सारखाच हा deepseek चा AI assistant आहे. जो तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. हा app खुला ठेवल्यामुळे कुणीही त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे या app ने AI चे मर्यादित क्षेत्र विस्तारित केले आहे.
Nvidia ला फटका का बसला?
Nvidia सारख्या अमेरिकन कंपन्यांना या app चा फटका का बसला ? याचे मुख्य कारण म्हणजे deepseek ला आलेला कमी खर्च. आणि दुसरं कारण म्हणजे deep seek ने AI assistant chat bot सगळ्या जगाला फुकट देऊन टाकला. त्याचाच फटका अमेरिकन कंपन्यांना stock market मध्ये बसला.त्यामुळेच NVIDIA कंपनीचा शेअर 17% घसरला.