Buddha Religion :  बौद्ध धर्माचा इतिहास

इ स पूर्व सहाव्या शतकात यज्ञ,कर्मकांड यांना अवाजवी प्राधान्य होते.

अनिष्ट सामाजिक परंपरेमुळे समाज दुभंगला होता.

• वैदिक वाङ्मयाबद्दल लोक अज्ञानी होते.

• अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता.

• अशा परिस्थितीत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांचा जन्म झाला.

• समाजाला नव्या विचाराची, आचाराची आवश्यकता होती.

• गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या रूपाने ती पूर्ण झाली.

*गौतम बुद्ध :

• गौतम बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 मध्ये झाला.

• त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला.

• त्यांचे नाव सिद्धार्थ असे होते. वडिलांचे नाव शुद्धोधन तर आईचे नाव महामाया होते.

० त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा तर पुत्राचे नाव राहुल असे होते.

• मानवी दुःखाचे मूळ काय, या विचाराने ते अस्वस्थ असत.

• या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला.

• बिहारमधील ‘गया’ येथे पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ असे म्हणतात.

• ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर वाराणसीजवळ सारनाथ येथे त्यांनी पहिले प्रवचन दिले.

• बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनास ‘धम्मचक्कपवत्तन’ म्हणजे धर्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.

• गौतम बुद्धांचा मृत्यू इ. स. पू. 483 मध्ये कुशीनगर येथे झाला.

*गौतम बुद्धांनी सांगितलेली आर्यसत्ये :

मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत.

१. दुःख : मानवी जीवन हे दुःखमय आहे.

२. तृष्णा : मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.

३. दुःख-निरोध : दुःखाचा अंत करता येतो.

४. प्रतिपाद : दुःख निवारण्याचा मार्ग.

*गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग :

गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला त्याला ‘अष्टांग मार्ग’ असे म्हणतात. सम्यक म्हणजे योग्य.

(१) सम्यक दृष्टी, (२) सम्यक विचार, (३) सम्यक भाषण, (४) सम्यक कृती, (५) सम्यक उपजीविका (६) सम्यक व्यायाम, (७) सम्यक स्मृती, (८) सम्यक समाधी.

*पंचशील :

अष्टांग मार्गावर जे नियम पाळायचे त्याला ‘पंचशील’ असे म्हणतात.

१. अहिंसा : हिंसा करू नये.

२. सत्य : खोटे बोलू नये.

३. अस्तेय : चोरी करू नये.

४. इंद्रिय संयम : सुखाच्या हव्यासावर नियंत्रण मिळवावे.

५. मादक पदार्थांचे सेवन करू नये.

*त्रिरत्ने :

(१) प्रज्ञा,

(२) करुणा,

(३) शील.

*बौद्ध संघ :

• गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी व आपल्या अनुयायांना संघटित करण्यासाठी ‘बौद्ध संघ’ स्थापन केला.

• जे लोक संघात प्रवेश करत त्यांना बौद्ध भिक्खू म्हणत.

• बौद्ध संघात सर्व जातीतील लोकांना प्रवेश होता.

• बौद्ध संघात स्त्रियांनाही प्रवेश होता.

• गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून ‘पाली’ या लोकभाषेचा वापर केला.

• ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा बुद्धांच्या शिकवणीचा ठसा साऱ्या जगावर खोलवर उमटला.

• ‘मानवता श्रेष्ठ आहे. सर्व मानव सारखे आहेत’ हा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोचवला. समाजाला कर्मकांडातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला.

*बौद्ध धर्माचे पवित्र वाङ्मय :

१. त्रिपिटक : विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्य पिटक.

२. मिलिंदपन

३. जातक कथा.

*बौद्ध धर्माला मिळालेला राजाश्रय :

सम्राट अशोक, राजा मिलिंद, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन.

Leave a comment