India in Mourya Period :मौर्यकालीन भारताचा इतिहास काय आहे जणून घ्या

* मौर्यकालीन भारत:

• भारताच्या इतिहासात मौर्यांचा इतिहास महत्त्वाचा आहे.

• मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले.

• सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रदेशातील स्वतंत्र राज्याची घोषणा केली.

चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याचा पराभव करून भारतात शांतता प्रस्थापित केली.

*चंद्रगुप्त मौर्य

• मौर्य साम्राज्याचा संस्थापक: चंद्रगुप्त मौर्य

• मधचा राजा धवा या जुलमी राजाचा पराभव करून चंद्रगुप्ताने अलधवर सत्ता प्रस्थापित केली,

• आजच्या बिहारमधील पाटणा म्हणजेच ‘पाटलीपुत्र’ ही त्याची राजधानी भोती.

• चंद्रगुप्ताने सेल्युकसचा पराभव करून काबूल, हेरात, कंदाहार हे प्रदेश श्रीर्य साम्राज्यात समाविष्ट केले.

• सेल्युकस निकेटरने ‘मेगॅस्थेनिस’ हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारात पाठवला होता.

• मेगॅस्थेनिसने तत्कालीन भारताचे वर्णन ‘इंडिका’ ग्रंथात केले आहे.

• कौटिल्य चाणक्य हे चंद्रगुप्त चाणक्याच्या दरबारात गुरू होते.

• कौटिल्य चाणक्याने ‘अर्थशास्त्र’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

• चंद्रगुप्ताचा मुलगा – सम्राट बिंदुसार.

• बिंदुसारचा पुत्र – सम्राट अशोक.

• चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला.

• चंद्रगुप्ताचा मृत्यू म्हैसूरजवळ श्रवणबेळगोळ येथे झाला.

• चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला होता असे मानले जाते.

*सम्राट अशोक:

० इ. स. पूर्व 273 च्या सुमारास सम्राट अशोक मगधचा राजा झाला.

• अशोक सम्राट होण्यापूर्वी तक्षशिला व उज्जयिनी या राज्यांचा राज्यपाल होता.

• अशोकने तक्षशिला येथे झालेले बंड मोडून काढले.

• अशोकने त्याच्या लेखांमध्ये ‘देवानाम् प्रिय, प्रियदर्शी राजा’ अशी पदवी धारण केली होती.

*कलिंगचे युद्ध :

• कलिंगचे युद्ध इ. स. पूर्व 261 मध्ये झाले.

या युद्धानंतर सम्राट अशोकने युद्ध त्याग केला व बौद्ध धर्म स्वीकारला.

• कलिंगच्या युद्धात अशोकचा विजय झाला; पण भयंकर रक्तपात झाला

• अशोकाने आपल्या राज्यात जागोजागी स्तंभ उभारले. (ते अशोक स्तंभया नावाने आजही प्रसिद्ध आहेत.) शिलालेख कोरले.

• सदाचार, अहिंसा, सत्य, भूतदया ही तत्त्वे माणसाने आचरणात आणावीत वडीलधाऱ्यांचा मान राखावा असा त्याचा आग्रह होता.

*सम्राट अशोकाचा धर्मप्रसार:

• सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला.

• त्याने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले.

• सम्राट अशोकाला सर्व धर्मांविषयी आदर होता.

*लोकोपयोगी कामे :

• माणसांना व पशूना मोफत औषधपाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले.

• उपयोगी औषधी वनस्पतींची लागवड केली.

• रस्ते बांधले, धर्मशाळा बांधल्या.

• रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली.

• वाटसरूंसाठी विहिरी खोदल्या.

*मौर्यकालीन राजकीय व्यवस्था:

• प्रजेचे रक्षण करणे व न्यायदान करणे ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती.

• राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी जे मंडळ होते त्याला ‘मंत्रिपरिषद’ म्हणत.

• जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला ‘रज्जुक’ म्हणत.

• तालुक्याच्या अधिकाऱ्याला ‘गोप’ म्हणत.

• खेड्याच्या प्रमुखाला ‘ग्रामणी’ म्हणत.

*मौर्य काळात सार्वजनिक जीवन:

• मौर्यकालीन लोक कृषिप्रधान होते. शेतीबरोबर उद्योगधंदेही भरभराटीस आले होते.

चकाकी असलेली भांडी मोठ्या प्रमाणात बनवली जात होती.

० नौका बांधणी’ हा उद्योग मोठा होता.

० व्यावसायिकांचे. व्यापाऱ्यांचे संघ होते. त्यांना ‘श्रेणी’ म्हणत.

० लोकांच्या मनोरंजनासाठी सण, उत्सव होत असत.

*मौर्यकालीन कला व साहित्य :

० सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकला व वास्तुकला खूप विकसित झाली.

• अशोकाने स्तंभ, स्तूप, विहार बांधले.

• ‘सारनाथ’ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावरील धर्मचक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे.

• मौर्य काळात पाली, अर्धमागधी भाषा प्रचलित होत्या.

• पाणिनीचे ‘अष्टाध्यायी’, चाणक्याचे ‘अर्थशास्त्र’ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

• याच काळात ‘तिपिटिक’ (त्रिपिटिक) या पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांची रचना पूर्ण झाली.

• त्रिपिटिकातील ‘थेरिगाथा’ या ग्रंथाची रचना स्त्रियांनी केली आहे.

• याच काळात गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित ‘जातक कथा’ लिहिल्या गेल्या.

Leave a comment