Cyclone Shakti: Caution alert in South India -शक्ती वादळामुळे दक्षिण भारतात सावधगिरीचा इशारा 

तापमानातील विषमता आणि वातावरणात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळे येतात. नियमित वादळांपेक्षा या वादळामुळे धोका अधिक निर्माण होतो. सध्या भारताला शक्ती या चक्रीवादळापासून नजीकच्या काळात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दक्षिण भारतातील काही राज्यांना आणि उत्तर भारतातीलही काही राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन :Arrival of southwest monsoon

चालू वर्षी म्हणजे 2026 यावर्षी भारतात लवकरच मान्सून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या बंगालचा उपसागर, दक्षिणेकडील काही भाग, अंदमान-निकोबार बेटे या ठिकाणी नैर्ऋत्य मान्सूनचे वाजत गाजत आगमन झाले आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाला लवकरच सुरुवात होईल असे वाटते. या घाईतच बंगालच्या उपसागरात 20 मे ते 30 मे च्या दरम्यान प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. या संभाव्य येणाऱ्या चक्रीवादळाचे नाव शक्ती चक्रीवादळ असे असेल. पुढील आठवड्यात म्हणजे 15 मे 20 मे 2025 च्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच 20 मे नंतर चक्रीवादळाचा तडाखा सुरू होण्याची शक्यता आहे. चक्री वादळाचा तडाखा दक्षिण भारतात बसण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे.

कोठे आणि केव्हा पाऊस पडेल? 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 20 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात दक्षिण भारतात होईल, असे वातावरण सध्या तयार झालेले आहे. 16 मे पर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भारताची कोकण किनारपट्टी, कर्नाटक, गुजरात, गोवा, छत्तीसगड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, आंध्र प्रदेश, सिक्कीम इत्यादी राज्यांमध्ये शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. दक्षिण भारतात ढगाळ वातावरण वरचेवर राहील. ढगाळ वातावरणामुळे हवेतील तापमान वाढण्याची शक्यता आहे. पण पावसाच्या सरींमुळे तापमानाची तीव्रता कमी सुद्धा होईल. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य ते काळजी लवकरात लवकर घेण्याची गरज आहे.

Leave a comment