सध्या महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाळवाचा म्हणावा तर पाऊस दिवसभर पडतोय. मान्सून म्हणावा तर तो अजून मान्सून कर्नाटकातही दाखल झाला नाही. मग हा कोणता पाऊस? शक्ती चक्रीवादळाचा परिणाम की मान्सूनपूर्व पाऊस?
दरवर्षी मान्सून पूर्व पाऊस लागतो; पण हवामानातील बदलामुळे काही वेळा मान्सूनपूर्व पाऊस लागत नाही. मान्सूनपूर्व पाऊस हा वळीव स्वरूपाचा, विजांच्या कडकडाटासह पडत असतो .पण हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार पडतो, तर काही ठिकाणी रिमझिम रिमझिम असा पडतो. सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडत आहे आणि हा पाऊस पाहून अनेक लोक चक्रावून गेले आहेत की हा पाऊस नेमका कोणता? आणि आत्ताच मे महिन्याच्या या पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. खरं तर शक्ती चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. यालाच मान्सूनपूर्व पाऊस असेही म्हटले जाते. या वर्षी म्हणजे 2025 साली पावसाचे प्रमाण 100% पेक्षा जास्त असेल, असा हवामान शास्त्राचा अंदाज आहे, त्याची चुणूक या मान्सूनपूर्व पावसाने दाखवलेली आहे . या पावसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पावसात कुठेही सोसाट्याचा वारा नाही की वादळ नाही.