Monsoon arrives in Kerala ahead of schedule, earliest onset in 16 years-मान्सून वेळेपूर्वीच केरळात दाखल,जाणून घेऊया अधिक माहिती.

2025 साल हे मान्सून पाऊस सर्वात प्रथम दाखल होण्यासाठी प्रसिद्ध झाले आहे. 2009 पासूनचा इतिहास पाहिल्यास इतक्या लवकर मान्सून कधीच भारतात म्हणजे केरळात दाखल झालेला नाही. हे कसे आणि का घडत आहे ?जाणून घेऊया अधिक माहिती.

23 मे रोजी मान्सून केरळात दाखल -Monsoon to hit Kerala on May 23, 2025

2009 साली मान्सून पावसाचे आगमन केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झाले होते. त्यानंतर 2025 सालामध्ये मान्सून केरळमध्ये 23 मे रोजी दाखल झालेला आहे. भारतातील केरळ राज्य हे मान्सून पावसाचे प्रवेशद्वार आहे. भारतात सर्वात प्रथम पावसाचे आगमन हे केरळ राज्यात होत असते. त्याप्रमाणे 2025 मध्ये 23 मे रोजी मान्सून पावसाने आगमन करून गेल्या पंधरा-सोळा वर्षांचा विक्रम मोडलेला आहे.

गेल्या सहा वर्षांतील केरळ मधील मान्सून आगमनाच्या नोंदी- Records of monsoon arrival in Kerala over the last six years

गेल्या सहा वर्षातील केरळमधील मान्सून आगमनाच्या नोंदी पाहिल्यास असे लक्षात येते की मान्सूनचे आगमन जास्तीत जास्त 29/ 30 मे च्या पुढे झालेले आहे. 2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून पाऊस केरळात दाखल झाला होता. 2019 मध्ये हाच मान्सून पाऊस 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. 2020 चा विचार केल्यास 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. 2021 मध्ये 3 जूनला, 2022 मध्ये 8 जूनला, 2023 मध्ये 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. ही सर्व आकडेवारी पाहता 2025 मध्ये मान्सून पावसाने 23 मे रोजी आगमन करून सर्व विक्रम मोडलेले आहेत. 1975 नंतरची आकडेवारी विचारात घेतली तर 1990 मध्ये 19 मे मध्ये मान्सून पाऊस केरळात दाखल झाला होता.

हवामानातील बदलाचा परिणाम- Impact of climate change

मान्सूनचा अनियमितपणा, ढगफुटी, कमी पाऊस किंवा अति पाऊस हे मुख्यतः हवामानातील बदलाच्या परिणामामुळे घडत असते. सध्या जगाचा विचार केल्यास संपूर्ण जगातील हवामान झपाट्याने बदलत चालले आहे. वैश्विक तापमानाचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे. त्याचा परिणाम निश्चितच हवामानाच्या बदलावर होत आहे. या बदलामुळे ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात त्याचा परिणाम पाऊस पडतो.

महाराष्ट्रासाठी मान्सूनचे शुभ संकेत -Auspicious signs of monsoon for Maharashtra

सध्या केरळ मध्ये 23 मे 2025 रोजी मान्सूनचे आगमन झाले असले तरी पूर्ण भारतात मान्सून लवकर दाखल होईल याची खात्री देता येत नाही ; पण महाराष्ट्रात मात्र लवकरात लवकर मान्सून पावसाची सुरुवात होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान- Huge losses for farmers in Maharashtra

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व अन्य काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. भुईमूग, भात, अन्य पिके अजून शेतातच असताना मान्सूनने कोल्हापूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. शिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अजून पेरणी झालेली नाही. ही पेरणी दरवर्षी मान्सून येण्यापूर्वी केली जाते; पण यावर्षी पावसाचे आगमन लवकरच झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

Leave a comment