इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले असले तरी अंतर्गत धुसफूस चालूच आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही मुक्त झालेली नाही. इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष चालूच आहे. अमेरिकेचा अरेरावीपणा संपूर्ण जगाला भोगाव लागणार आहे. पश्चिम आशियात जो युद्धजन्य संघर्ष चालू आहे, त्याचा फटका भारतालाही बसणार आहे. बसत आहे, याची कबुली भारताच्या पंतप्रधानांनी दिली आहे आणि बचतीचा संदेश ही दिला आहे.
पंतप्रधानांचा संदेश काय आहे?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी देशाला बचतीचा सल्ला दिला आणि आवाहनही केले आहे. कोण कोणत्या बचती कराव्यात हेही स्पष्ट केले आहे.
1 सध्या सोने खरेदी करू नका. सोन्याची मागणी वाढल्यास सोने बाहेरून आयात करावे लागते. त्यामुळे भारतीय चलन परदेशात जाते.
2 पेट्रोल डिझेल याचा वापर कमी करा. सार्वजनिक वाहनांचा वापर करा.
3 शक्य आहे तेथे वर्क फ्रॉम होम करावे जेणेकरून वाहतूक कमी होईल.
4 अनावश्यक खरेदी टाळा बचतीची सवय लावा.
वरील सर्व बाबी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्या आहेत. पण Charity begins at home या म्हणीप्रमाणे पंतप्रधान कार्यालयातून बचतीची सुरुवात झाली पाहिजे. पंतप्रधानांनी स्वतः परदेश दौरे आखू नयेत. इकडे बचत करा म्हणून पंतप्रधान सांगतात आणि इकडे युरोप ददरे आखतात.हे कितपत योग्य आहे? भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री केवळ एक वेळेस जेवायचे; पण आपले पंतप्रधान मात्र दिवसातून चार ते पाच वेळा वेशभूषा बदलतात. आहारासाठी परदेशातून मशरूम सारखे महागडे पदार्थ मागवतात. हे बचतीत कितपत बसते? स्वतः उधळपट्टी करायची. मंत्र्यांनी उधळपट्टी करायची. मंत्री नसलेल्यांना पण संरक्षणाच्या नावाखाली वाहनांचा ताफा द्यायचा. हे बचतीत बसते का? सर्व मंत्रिमंडळ सार्वजनिक वाहनातून प्रवास करतील का? असे जेव्हा चित्र पाहायला मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने बचत होईल आणि पंतप्रधानांनी दिलेले आवाहन लोकही पाळतील.