भारतीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांसह अनेक सच्चे पत्रकार नेहमीच टीका करत आलेले आहेत. निवडणूक आयोगाचा कारभार हा कुठेतरी जनतेला अंधारात ठेवून होत आहे. असा आरोप विरोधी पक्षांचा आहे. त्याची वेळोवेळी खात्री पण झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर कमालच झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यासाठी वापरलेली ईव्हीएम मशीन्स ज्या इमारतीमध्ये ठेवलेले होती,त्या इमारतीला म्हणजेच संपूर्ण इमारतीला नाही तर जेथे ईव्हीएम मशीन ठेवलेली होती त्या ठिकाणी फक्त आग लागली आणि ही आग खरोखरच संशयास्पद आहे. म्हणूनच आग लागली की लावली याची चौकशी व्हायला हवी; पण चौकशी करणार कोण? चौकशी करणारे सरकार निवडणूक आयोग काम करते सरकारचे. मग चौकशी कोणी करायची? भारतात लोकशाहीचा खून केला जात आहे. आणि हा खून पावलोपावली होत असल्याचा प्रचिती हे सरकारच देत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही बातमी कोणत्याही वर्तमानपत्राने फ्रंट पेजलाच काय कुठेच दिली नाही काही वर्तमानपत्रांनी दिली असेल पण ती कुठल्यातरी कोपऱ्यात! म्हणजेच हे विद्यमान सरकार लोकशाही तंत्राने निवडून आलेले नाही हेच त्यांनी सिद्ध केले आहे.