भारतीय हवाई दलाचे विमान वारंवार क्रॅश होते आणि सरकार तिकडे सरळ सरळ दुर्लक्ष करते की काय अशी मनात साशंकता निर्माण होते. आपले लष्कर आणि लष्करी साधनसामग्री मजबूत असणे आवश्यक असते. गेल्या चार-पाच वर्षांचा इतिहास पाहिला तर हवाई दलाची कित्येक विमाने क्रॅश झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. आसामच्या जोरहाट एअर बेसवर हा अपघात झाला असून लँडिंगच्या वेळी आग लागली आणि विमानाचे दोन तुकडे झाले. सहवैमानिक बचावला पण वैमानिक मृत झाला.
गेल्या पाच वर्षात 34 वेळा हवाई दलाची विमाने /हेलिकॉप्टर्स यांचा अपघात झाला आहे. 2021 साली बिपिन रावत यांच्यासह 14 जणांचा लष्करी विमानामधून प्रवास करताना मृत्यू झाला होता.
हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या पाचही जवानांनी देशासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे हवाई दलाने समर्पित अधिकारी आणि जवान गमावले आहेत. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात हवाईदल सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असेही नियोजनात म्हटले आहे.उड्डाणानंतर काही मिनिटातच ही दुर्घटना घडलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार ए एन 32 हे वाहतूक विमान शनिवारी सकाळी दहा वाजता जोरहाट हवाई तळावरून चाबुआ लष्करी तळाकडे रवाना झाले होते. मात्र उड्डाणानंतर लगेचच वैमानिक आणि पुन्हा उतरण्याची विनंती केली, पण त्यापूर्वीच अपघात झाला.