BuddhaLifeStory-Part : 17 : बुद्धाची देशत्यागाची तयारी

बुद्धाचा जीवन परिचय करून देत असताना मागील भाग 16 मध्ये सेनापती आणि सि‌द्धार्थ यांच्यात जो युद्धाच्या संबंधी वाद झाला त्यातून सिद्धार्थचा संघात पराभव झाला. दुसऱ्या दिवशी सेनापतीने कोलियाशी युद्ध करण्यासाठी व सैन्य उभारावासाठी शाक्य संघाची सभा बोलावली. त्या सभेत सेनापतीने आणखी एक ठराव मांडला तो असा- “कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या युवकांची … Read more

Buddha Life Story-Part 15 :सि‌द्धार्थचा शाक्य संघात प्रवेश

इ.स. पूर्व सहाव्या शतकात आणि त्यापूर्वी आणि त्यानंतरही सुद्धा शाक्यांचा एक संघ होता. संघ ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेनुसार वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर शाक्य युवकाला संघाची दीक्षा दिली जाते.ती सर्वांना मिळत होती, असे नाही. या संघाचे सभासद होण्यासाठी सिद्धार्थ गौतमालाही वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाक्य संघात प्रवेश करणे अनिवार्य वाटत होते. … Read more

Buddha Life Story-Part 14

महामंत्री हरला – बुद्ध जिंकला. राजा शुद्धोदनाच्या सांगण्यावरूनच महामंत्री उदयीनने सिद्धार्थ गौतमाला विषय सुखात अड‌कण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने त्यासाठी पुराणातील ऋषीमुनींचे आणि राजांचे दाखले दिले होते. जेणे करून सिद्धार्थचे मन परिवर्तन होईल आणि सिद्धार्थ विषय-सुखात रमून जाईल; पण त्या खटाटोपाचा काहीच उपयोग झाला नाही.सिद्धार्थने महामंत्र्याला कशा प्रकारे उत्तर दिल ते पाहू—— “हे महामंत्री, तुला … Read more

Buddha: Life Story Part 13 :सि‌द्धार्थाला विषयसुखाकडे वळवण्यासाठी महामंत्र्याचा आटापिटा

सिद्धार्थ गौतमाला कामवासनेत म्हणजेच विषय सुखात बुडवण्यासाठी कपिलवस्तू नगरातील आणि नगराच्या बाहेरीलही सौंद‌र्यवतींना तीन महालात आणि त्या महालांच्या आवारातील उद्यानात आणून ठेवले होते. पण या सर्व सौंदर्यवतींना सिद्धार्थला जिंकण्यास अपयश आले होते. त्यांच्या अंगविक्षेपाने सिद्धार्थाची स्थितप्रज्ञता भंग पावली नाही. शेवटी राजपुरोहित अर्थात महामंत्र्याने स्वतः सिद्धार्थला या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी आणि सिद्घार्थाशी संवाद साधण्याचा निश्चय केला. राजा … Read more

Buddha: Life Story Part 12: संयमी राजपुत्रापुढे सौंद‌र्यवतींचे अपयश

पुरोहित उदयीनने दिलेला उपदेश त्या सुंदर ललनांनी चांगलेच मनावर घेतले होते. त्यांनी आपले सामर्थ्य आणि सौंदर्य पणास लावण्याचा निश्चय केला होता. निश्चयी, संयमी, एकाग्र अणि धीरगंभीर राजपुत्राला वश करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे, हे त्या सौंदर्यवतींना माहीत होते. पुरोहिताच्या प्रेरणेने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. राजपुत्रासाठी बांधलेल्या वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळ्या तीन महालात सिद्धार्थ ऋतुमानानुसार योग्य … Read more

Buddha: Life Story Part-10

सिद्धार्थ गौतमाचा विवाह सि‌द्धार्थ गौतम सोळा वर्षाचा झाला होता. त्यामुळे सिद्धार्थाच्या कुटुंबात त्याच्या विवाहाची चर्चा सुरु झाली होती. तत्कालीन परंपरेनुसार मुलगा आणि मुलगी दोघेही वयात आले की त्यांचे लग्न केले जात होते. सिद्धार्थही त्याला अपवाद नव्हता. यावेळी अनेक ठिकाणी विशेषतः राजघराण्यात स्वयंवर ठेवण्याची प्रथा होती. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोदरा नावाची त्याची मुलगी वयात … Read more

Buddha: Life Story-Part-9

गौतम बुद्ध- संपूर्ण परिचय- भाग 9  भूतदया : देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम एकदा सि‌द्धार्थ गौतम आपल्या वडिलांच्या शेतात आला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सिद्धार्थ एका झाडाखाली चिंतन करत बसला होता. तो निसर्गाच्या सानिध्यातील शांतता आणि सौंद‌र्याचा आनंद घेत होता. इतक्यात एक पक्षी तडफडत येऊन त्याच्या समोरच पडला. तो पक्षी घायाळ झाला होता. सिद्धार्थने ते दृष्य पाहिले. … Read more