सारनाथ: Sarnath

सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी गौतम बुद्धाला मिळाला होता. अन्यथा गौतम बुद्ध आणि त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत इतक्या ताकदीने कदाचित पोहोचले नसते. Sarnath येथे बौद्ध तीर्थस्थान आहे. त्याच ठिकाणी अशोक स्तंभ आहे. या सारनाथ मधील महत्त्वाच्या दोन बाबींबद्द‌ल आपण अधिक माहिती घेणार आहोत.

सारनाथची संक्षिप्त माहिती: Brief Information about Sarnath.

ठिकाणाचे नाव : सारनाथ ठिकाणाचा प्रकार: ऐतिहासिक, सांस्कृतिक

प्रसिद्धी : अशोक स्तंभ, बौद्ध तीर्थक्षेत्र

जवळचे ठिकाण: वाराणसी / Varanasi

वाराणसी अंतर: किलोमीटर

जिल्हा : वाराणसी

राज्य. : उत्तर प्रदेश

सारनाथला कसे जायचे ? How to go to see Sarnath?

सारनाथला जाण्यासाठी वाराणसी हे सर्वांत जवळचे ठिकाण आहे. वाराणसीला विमानाने किंवा रेल्वेने जाता येते. मुंबई ते वाराणसी तिकीट 4000 रु. ते 6400 रु.च्या आसपास असते. पण आपला प्रवास पटकन होतो. ठिकाणे पाहण्यासाठी ऊर्जा लागते .त्याची बचत होते. नागपूर ते वाराणसी विमान किंवा रेल्वेने जाता येते .नागपूर ते वाराणसी जमीन मार्ग अंतर 730 किलोमीटर आहे. विमान तिकीट 5000 रु. ते 7000 रु. पर्यंत असू शकते.

सध्या उत्तर प्रदेशला मुंबई, नागपूरहून जलद धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरु आहेत. रेल्वेने जाणे सोयीचे आणि कमी खर्चात होते.

देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple

सारनाथ कोठे आहे? Where is Sarnath?/ sarnath, varanasi

सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात वाराणसी पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे. या गंगा नदीला वरुणा नदीं जेथे मिळाली आहे. या ठिकाणी सारनाथ हे नगर वसलेले आहे. सारनाथ हे गौतम बुद्धाला ज्ञान‌प्राप्ती झालेल्या बोधगया या ठिकाणापासून 250 किलेमीटर अंतरावर आहे.

सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे? Sarnath Famous for?

सारनाथ हे ठिकाण दोन गोष्टींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यांतील पहिली गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांना बोधगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपल्या निवडक शिष्यगणांसह फिरत फिरत सारनाथला आले. तेथे त्यांनी बौद्ध संघ स्थापन केला आणि आपल्या विचाराचे पहिले प्रवचन (मार्गदर्शन) उपदेश याच ठिकाणापासून केला. यासाठी सारनाथ प्रसि‌द्ध आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे कलिंगच्या युद्धात विजय मिळवूनही हजारो माणसांच्या मृत शरीराचा खच पाहून पश्चात्ताप झाला. त्याच सम्राट अशोकने या सारनाथ येथे अशोक स्तंभ उभारला आहे हा स्तंभ बौद्ध धर्माच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा प्रतिकात्मक असा स्तूपच आहे. त्यासाठी सारनाथ हे प्रसि‌द्ध ठिकाण आहे.

सारनाथ : विविध नावे अर्थ: Sarnath: Different Names and meaning:

सारनाथ या नगराला पूर्वी विविध नावे होती. सारंगनाथ हे सारनाथशी साधर्म्य असलेले नाव आहे. पूर्वी येथे वनच होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हरणांचा सह‌वास होता. सारंग म्हणजे हरिण . हरणांचे वास्तव्य आहे असे ठिकाण म्हणजे सारंगनाथ होय .सारंगनाथ या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे सारनाथ हे नाव पडले. आजही तेच नाव आहे. याशिवाय हरिणाशी संबंधित आणखी दोन नावांनी सारनाथ ओळखले जाते. ती नावे म्हणजे मृगदव किंवा मिगदव.

उसिपताना किंवा ऋषिपतना या दोन नावांनी सुद्धा सारनाथची ओळख होती. पतन पासून पटन किंवा पटन पासून पतन असा शब्द निर्माण झाल्यास पटन याचा अर्थ पटना (हिंदी) म्हणजेच पटणे (समजणे). ज्या ठिकाणी बुद्धांनी आणि त्यानंतर अनेक ऋषींनी (बौद्ध भिक्षुक) जो विचार सांगितला तो लोकांना, बौद्ध अनुयायांना पटला. आणि त्या विचाराचे ते अनुकरण करु लागले. अशा प्रकारे ठिकाणाला इसिपतना, ऋषिपटना अशी नाव पडली होती; पण काळाच्या सारनाथ हेच नाव टिकले, आजही सारनाथ या नावानेच आपण या ठिकाणाला ओळखतो.

बुद्धांचा पहिला उपदेश: सारनाथ: Buddha’s First Sermon in Sarnath:

गौतम बुद्धांचा जन्म इ.स. पूर्व 563 मध्ये वैशाख शुद्ध पौर्णिमेला झाला. आजही दरवर्षी वैशाख शुद्ध पौर्णिमेस बुद्ध जयंती साजरी केली जाते. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी (29) त्यांनी सर्वसंगपरित्याग करून म्हणजे सर्व सुखाचा त्याग करून वनात जाऊन मानवी जीवनाचे अंतिम सत्य शोधण्यासाठी तपश्चर्या करू लागले. अखेरच्या टप्प्यात बुद्ध बोधगया या ठिकाणी तपश्चर्या करू लागले आणि तेथेच त्यांना ज्ञान‌प्राप्ती झाली. त्यानंतर गौतम बुद्ध आपल्या शिष्य‌गणांसह आपल्या प्रवाहात येतील त्यांना सामील करून घेत फिरत फिरत सारनाथला आले.

गौतम बुद्ध सारनाथला आल्यावर तेथे काही दिवस मुक्काम केला आणि उपदेशाचा दिवस ठरला. तो दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमेचा. या दिवशी गौतम बुद्धांनी जो उपदेश केला त्याला ‘धम्मचक्कपवत्तम असे म्हणतात, हाच तो दिवस ज्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरु‌पौर्णिमेला गौतम बुद्धांच्या विचारांचा उपदेश केला पाहिजे. गौतम बुद्धांचे विचार अंमलात आणले पाहिजेत.

‘धम्मचक्कपवत्तन’ म्हणजे धर्म चक्राचे परिवर्तन होय. आपल्याला पुराणातील कर्मकांड युक्त आणि सामाजिक विषमता निर्माण करणारा धर्म त्यागून नवीन धर्म स्थापन करायचा आहे. म्हणजेच धर्मात बदल करायचा आहे. धर्म म्हणजे विचार प्रवाह असा अर्थ घेतला तर याच दिवसापासून म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेपासून गौतम बुद्धांनी नवीन विचार प्रवाह निर्माण केला. धर्म चक्रामध्ये या दिवसापासून परिवर्तन झाले. म्हणून या प्रवचनाला (Sermon) धम्मचक्कपवन्तन असे म्हणतात.

बुद्‌धांनी सारनाथ येथे सांगितलेली चार आर्यसत्ये: Buddha’s Aryasatya

1) दुःख मानवी जीवन दुःखमय आहे.

2) तृष्णा: मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.

3) दुःख निरोध- दुखःचा अंत करता येतो.

4) प्रतिपद्: दुःख निवारण्याचा मार्ग.

सम्यक (योग्य) दृष्टी, सम्यक विचार, सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती सम्यक समाधी हे बुद्धांनी दु:ख निवारण्याचे अष्टांग मार्ग सांगितले आहेत.

अशोक स्तंभ: Ashok Stupa:

सम्राट अशोकाने सारनाथ येणे एक स्तंभ (स्तूप) उभारलेला आहे. हा स्तंभ सारनाथ येथेच का उभारला असा प्रश्न मनात निर्माण होणे साहजिकच आहे. सारनाथ येथे गौतम बुद्धांनी ‘धम्मचक्कपवन्तन हे पहिले प्रवचन दिले. सम्राट अशोकाचे वडील बिंदुसारने गौतम बुद्ध आणि भिक्षुकांचा नौका कर माफ केला होता. म्हणजे बिंदूसार‌पासूनच बुद्धांबद्द‌ल मौर्य कुळात आदर होता. इ.स पूर्व 261 मध्ये कलिंगचे युद्ध झाले आणि हजारो माणसांचे मृतदेह पाहून अशोकने शस्त्र खाली ठेवून बुद्ध धर्म स्वीकारला.

बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी अशोकाने भारतात हजारों ठिकाणी शिलालेख, स्तंभ, गुफा यांच्या माध्यमातून दीर्घकाळ टिकणारी स्मृतिस्मारके उभारली. सम्राट अशोक हा भविष्याचा वेध घेणारा राजा होता. आपण केलेले कार्य दीर्घकाळ टिकावे आणि भविष्यात काहीही स्थित्यंतरे झालीत तरी बुद्धांचा विचार जिवंत राहावा, या उद्देशाने अशोकाने स्तूप, स्तंभ उभारलेत. कदा‌चित सम्राट अशोक जन्माला आलाच नसता, तर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात झाला नसता. कदाचित बुद्ध जगाला कळलाच नसता. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लिखित स्वरु‌पात मांडणारा एखादा लेखक या यात्रेत सहभागी झाला असता, तर एक हजार पानी ग्रंथ निर्माण झाला असता. तेच शरद पवारांच्या बाबतीत, त्यांचे प्रचंड कार्य टिपणारा लेखक जन्मला नाही. असो.

सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या अशोक स्तंभाच्या कळसावर चार सिंह आहेत. हे सिंह कोणत्याही बाजूने पाहिले तर ते तीनच दिसतात. हे चार सिंह म्हणजे शक्ती, साहस,गौरव आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक स्तंभावरील हे चार सिंह घेतलेले आहेत. भारताची राजमुद्रा ही चार सिंहांचीच बनलेली आहे.

अशोक स्तंभावर असलेले अशोक चक्र हे आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यावर उमटवलेले आहे. ते गडद निळया रंगाचे आहे. त्याला 24 आरे आहेत.सम्राट अशोकाच्या प्रत्येक शिलालेखात हे अशोक चक्र दिसते.
अशोक स्तंभावर ‘सत्व मेव जयते’ असे कोरलेले आहे. हे भारताचे ब्रीद वाक्य आहे. सदाचार, धर्माचे पालन (सत्य धमाचे) गतिमानता याचे द्योतक म्हणजे हे अशोक चक्र आहे. यावरून अशोक स्तंभाचे किती महत्त्व आहे, हे तमाम भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे.

Leave a comment