Amazon rainforest : Myrciaria Dubia

ब्राझील या देशात अनेक प्रकारची फळझाडे आहे आढळतात. ब्राझील हा देश Amazon rainforest च्या भव्य जंगलात येतो. या देशात Myrciaria Dubia हे ॲमेझॉनच्या नदी किनारी आढळणारे छोटेसे झाड आहे. सह्याद्री पर्वतरांगेत आढळणाऱ्या करवंदीच्या झाडाला जशी गुच्छ स्वरूपात फळे लागतात, त्याचप्रमाणे या झाडाला गुच्छ स्वरुपातच फळे लागतात. या झाडाला camu-camu किंवा camocamo या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे एक लहान झाड असून 3 ते 5 मीटरपर्यंत या झाडाची उंची असते. या झाडाची फळे लाल- जांभळ्या रंगाची चेरीसारखी किंवा करवंदासारखी असतात. या फळात क जीवनसत्व मुबलक असते. याशिवाय प्रथिने, लोह, पोटॅशिअम, कॅल्शियम, सोडिअम, कर्बोदके मुबलक प्रमाणात असतात. या फळाची चव आंबट असल्यामुळे साखरेच्या पाकात घालून ही फळे खाल्ल्यास अधिक रुचकर लागतात. या फळांचा रस गुलाबी रंगाचा असतो. आईस्क्रीम, मिठाई इत्यादी पदार्थ बनवताना या फळांचा रस वापरतात. त्यामुळे आईस्क्रीम एक वेगळीच चव येते. या फळांना सुकवून साखरेच्या पाकात घालून किंवा लोणच्यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवून बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. अमेरिकेतील बाजारात या पदार्थांना मागणी वाढत आहे.

Leave a comment