महाराष्ट्रातील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 353 वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या राज्याभिषेकासाठी देशभरातून हजारो, लाखो लोक जमा होतात आणि राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतात. शिवराज्याभिषेक ही केवळ परंपरा नाही ,तर रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या लोकराजाचा महोत्सव आहे.धर्मभेद आणि जातिभेद विरहित स्वराज्य आणि रयतेचे राज्य निर्माण करणारा या विश्वातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवरायांची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती असणारा माणूस अमर होतो आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहे. शिवरायांच्या राज्यात सर्वांना समान न्याय होता. तेथे धर्माच्या जातीच्या राजकारणाला थारा नव्हता. म्हणूनच शिवाजी महाराज हे जगातील एकमेव असे राजे आहेत की त्यांनी आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने संपूर्ण जगातील लोकांचे मन जिंकले आहे. शिवराज्याभिषेक निमित्त शिवरायांना विनम्र अभिवादन. शिवरायांचा राज्याभिषेक साजरा करणे एवढेच आपले कार्य नसावे. शिवरायांच्या विचारांचे आणि आचारांचे स्वतःच्या जीवनात अंमल करणे हाच खरा शिवराज्याभिषेक आहे आणि तीच खरी शिवरायांना आदरांजली आहे.