जगातील अनेक उष्ण कटिबंधीय देशात रबराची झाडे आढळतात. मलेशिया या छोट्याशा देशात एकूण क्षेत्राच्या 60% क्षेत्र जंगलाचे आहे. त्यात रबराची भरपूर झाडे आहेत. या देशातून रबरापासून मिळणाऱ्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात rubber trees आढळतात.या झाडाची पाने गडद तपकिरी-काळसर- रंगांची जाडसर पाने असतात. ही झाडे सरळसोट वाढतात. चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी ही झाडे ॲमेझॉनच्या जंगलात मुबलक प्रमाणात मिळतात. या झाडाला खाच पाडून त्याठिकाणी एखादे भांडे लावले जाते. या भांड्यात रबराच्या झाडाचा चीक [sap] पडत राहतो. भांडे भरले की चीक[sap] काढून दुसऱ्या ठिकाणी खाच पाडून तेथे भांडे बांधले जाते. या रबरापासून अनेक रबरी’ वस्तू बनवतात. या झाडाची उंची 30 ते 40 मीटर असते. या रबराच्या झाडाचे आयुष्य 100 ते 150 वर्षे असते. Hevea Brasiliensis असे या रबराच्या झाडाचे वैज्ञानिक नाव आहे. या रबराच्या झाडाचा चीक[sap] शुभ्र पांढऱ्या रंगाचा असतो. झाडे सहा ते सात वर्षांची झाली उत्पन्नाला सुरुवात होते. या झाडांपासून रबर मिळवले जाते.