साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
बोरिस पास्टरनाक
Boris pasternak
जन्म : 10 फेब्रुवारी 1890
मृत्यू : 30 मे 1960
राष्ट्रीयत्व : रशियन
पुरस्कार वर्ष: 1958
बोरिस पास्टरनाक हे सुप्रसिद्ध रशियन लेखक होते. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर पास्टरनाक यांचे ‘डॉ. जिवागो’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात रशियन क्रांतीनंतर क्रांतीचे फलस्वरूप अगदी तटस्थ भूमिकेतून त्यांनी मांडले. एक प्रकारची ती समीक्षाच होती. त्यांच्या या पुस्तकाला नोबेल पुरस्कार मिळाला, परंतु शासकीय आडकाठीमुळे त्यांनी तो पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.