2026 हे उच्चांकी तापमानाचे वर्ष आणि उच्चांकी तापमानाचा उन्हाळा मानला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगबरोबरच प्रचंड वृक्षतोड, जंगल नष्ट करण्याची प्रवृत्ती आणि सिमेंटचे रस्ते अशा अनेक कारणांनी भारतासह महाराष्ट्र तापला आहे. विशेषतः विदर्भात प्रचंड उष्णता असून आजही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तापमान थोडे कमी वाटत असले तरी विदर्भ जसाच्या तसा तापलेला आहे.
विदर्भात कुठे किती पारा आहे?
विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 47 1 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर चंद्रपूर 46.2 अंश सेल्सिअस, गडचिरोली 46°c, वर्धा 45.5°c, अमरावती 45.4 अंश सेल्सिअस नागपूर 45° c, भंडारा 45° c ,अकोला 44.96, गोंदिया 44.9 ,यवतमाळ 43.8 अंश सेल्सिअस, जळगाव 43.6, परभणी 42.1 अंश सेल्सिअस, मालेगाव 41.6,बीड 41.2 , छत्रपती संभाजीनगर 40.7 , अंश सेल्सिअस ,बुलढाणा 40.4 सोलापूर ४० अंश सेल्सिअस तापमान आहे.
यावरून विदर्भासह मराठवाडा सुद्धा किती तापलेला आहे स्पष्ट होते. नागरिकांनी या उष्णतेच्या लाटेच्या काळात काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. सकाळी अकरा वाजल्यानंतर घरातून बाहेर पडू नये.