नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचे जाळ दिवसेंदिवस विस्तारित होत असून आरसीसीचे शिवराज मोटेगावकर गजाआड झालेले आहेत. त्यांना अटक केलेली आहे. नीट परीक्षेच्या दहा दिवस अगोदरच मोटेगावकरणे पेपर मिळवला होता. प्राध्यापक कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याकडूनच मोटेगावकरांनी पेपर मिळवल्याचे कळते. महाराष्ट्रात गाजावाजा असलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर असून त्यांचा या नीट परीक्षेमध्ये दबदबा होता. तो दबदबा याच मार्गाने निर्माण केला होता की काय? याचा संशय आता वाढलेला आहे.नीट परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकरण कितीतरी वर्षांपासून हे चालत असले पाहिजे आणि या राज्यातील महत्त्वाचे क्लासेसचे संस्थापक या पेपर फुटीच्या प्रकरणात अडकले पाहिजेत. याची पाळीमुळे खोल असली पाहिजेत.या सगळ्यांचा उलगडा सीबीआय ने केला पाहिजे आणि ही परीक्षाच रद्द केली तर क्लासेसचे फॅड राज्यातून कमी होईल.
बारावीच्या परीक्षेच्या गुणांवरच विद्यार्थ्यांची निवड व्हावी
बारावीच्या परीक्षेच्या गुणावरच विद्यार्थ्यांची मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील महाविद्यालयात निवड व्हावी .असे झाल्यास महाराष्ट्रात जो क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे. त्याला आळा बसेल आणि गोरगरीब मुलांना न्याय मिळेल. गोरगरीब मुले उत्तम प्रकारे बारावीचा अभ्यास करतील आणि चांगले गुण काढतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारेल.शिक्षक अकरावी, बारावी परीक्षेचे वर्ग चांगले घेतील आणि विद्यार्थ्यांचे कल्याण होईल.