Shubaman Gill is the new captain of Indian Test cricket-शुभमन गिल भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार 

एकापेक्षा एक दिग्गज कर्णधार लाभलेल्या भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार म्हणून शुभमन गिल या उमद्या तरुण क्रिकेटपटूला संधी मिळाली आहे. या संधीचे सोने शुभमन गिल कितपत करतो, हे येणारा काळच ठरवेल. शुभमन गिल याच्या विषयी सविस्तर माहिती.

कोण आहे शुभमन गिल? Who is Shubaman Gill?

शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट मधील एक नवा, उमदा आणि स्टार क्रिकेटपटू आहे. 2025 मध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा मध्ये प्ले ऑफ पर्यंत शुभमन गिल ऑरेंज कॅप धारण करणारा क्रिकेटपटू अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. अर्थात एवढ्यावरच मर्यादित त्याची ओळख नाही. त्याने एक दिवशीय क्रिकेट सामन्यात T-20 क्रिकेट सामन्यात आणि कसोटी क्रिकेट सामन्यात आपल्या उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले आहे. 2020 मध्ये शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.आतापर्यंत शुभमन गिलने 32 कसोटी क्रिकेट सामने खेळले आहेत.या 32 कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत.कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 35 ने शुभमनने 1893 धावा काढल्या आहेत.धावाची आकडेवारी पाहता शुभमन गिलची कामगिरी तितकिशी समाधानकारक नसली तरी तो नेतृत्वाची धुरा समर्थपणे पार पाडेल, अशी आशा निवड मंडळाला आहे.

ज्येष्ठ खेळाडूंचे शुभमन गिलसमोर आव्हान -Senior players challenge Shubman Gill

ऋषभ पंत, बुमराह यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभव खेळाडूंचे शुभमन गिल याच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. या दोघांचीही क्रिकेट मधील कामगिरी शुभमन गिल याच्यापेक्षा उत्तम राहिली आहे. तरीही नवा संघनायक आपल्या संयमी नेतृत्वाने ज्येष्ठांसह सर्वांनाच चांगल्या प्रकारे हाताळेल अशी निवड मंडळाला खात्री आहे.

ऋषभ पंतने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये 42 च्या सरासरीने 2948 धावा अवघ्या 43 कसोटी सामन्यात काढल्या आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आणि 15 अर्धशतके आहेत. बुमराह तर सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून खतनाम पावलेला आहे. पण सध्या तो फिट- अनफिट असल्यामुळे त्याचे नाव संघनायक म्हणून मागे पडले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा यासारखे दिग्गज आणि अनुभवी खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये आता खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाला शुभारंभ झाला असे म्हटले जाते.

Leave a comment