संपूर्ण भारतातच सायबर गुन्हेगारी वाढत असून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एकशे कोटींच्या रू.च्यावर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला आहे. ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहार ही सोय झाली असली तरी त्यातून सायबर गुन्हेगारांसाठी पैसे हडपण्याची मोठी संधी निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर सवलतींचे आमिष देऊन ते डिजिटल अरेस्टची भीती घालून नागरिकांची बँक खाती साफ करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या अदृश्य टोळ्या थेट मोबाईलचा ताबा घेऊन नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई लंपास करीत आहेत.ही बाब खूप गंभीर आहे .
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 28 महिन्यात सायबर फसवणुकीच्या तब्बल 10, 341 तक्रारी दाखल झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी तक्रारदारांच्या 120 कोटींच्या वर डल्ला मारला आहे. एपीके आणि गिफ्ट फाइल्स मोबाईलवर पाठवून नागरिकांना खरेदीसाठी सवलतीचे आमीष दाखवले जाते. नामांकित खरेदी-विक्री कंपन्यांसह वीज वितरण कंपन्या, विमा कंपन्यांची नावे बनावट वेबसाईट तयार केल्या जातात. त्याद्वारे नागरिकांना मोबाईलचा ताबा घेऊन त्यांच्या बँक खात्यामधील पैसे इतर खात्यांवर वळवले जातात.मोबाईलचे सिम कार्ड, आधार कार्ड, बँक खाते, विमा पॉलिसीची कामे करण्याची कारणे देऊन बँक खात्यांचे तपशील मिळवले जातात. त्यातूनही फसवणूक केल्याचे प्रमाण वाढले आहे.