डासांचा व्हॅलेंटाइन डे /Dengue Mosquito

निसर्गातील प्रत्येक जीव आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. यासाठी प्रणयक्रीडा आवश्यक असते. मानवेतर सर्व प्राण्यांमध्ये प्रणयक्रीडा ही जबरदस्तीने होत नाही. नर मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असतो. डासांचेही असेच असते.

सर्वसाधारणपणे फ्रेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात भारतात तापमानात थोडी वाढ होते. थंडीचा प्रभाव कमी झालेला असतो. दमट हवामान डासांना प्रजोत्पादनास अनुकूल असल्याने फेब्रुवारी महिन्यातच डासांच्या व्हॅलेंटाइन डे ला सुरुवात होते.दरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे जगभर सादरा केला जातो. योगायोगाने याच महिन्यात डासांच्या प्रणयक्रीडेला उधाण येते.

प्राण्यांच्या अनेक जमातीमध्ये नर एकत्र येऊन माद्यांना आकर्षित करण्यासाठी नृत्य करतात.या काळात पक्षी, कीटक वर्गातील नरांच्या पिसांचा, त्वचेचा रंग बदलतो. हा बदल निसर्गत: माद्यांना आकर्षित करण्यासाठीच असतो.

 

 

14 फेब्रुवारी या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day)च्या आसपास नर डासांच्या झुंडीच्या झुंडी आकाशात एकत्र दिसतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात एका रेषेत पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे डासांचे म्हणजे नर डासांचे सामुहिक नृत्य आकाशात चाललेले असते. नर डासांचे आयुष्य फक्त सहा दिवसांचे असते. या सहा दिवसांच्या काळात त्याला एक तरी मादी मिळालीच पाहिजे ,अशी प्रत्येक डासाची अपेक्षा असते. या सहा दिवसांच्या काळात आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नरांची धडपड चालू असते. नर डासांना आपल्या करामती दाखवण्यासाठी थव्यांच्या स्वरुपात आकाशात नृत्य करावे लागते. हे डास समुहात नृत्य करत असल्यामुळे त्यांना एक प्रकारची सुरक्षिततेची हमी असते. म्हणूनच या काळात डास मोठ्या संख्येने आकाशात भिरभिरत असतात. या काळात नर डास आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा गंध सोडतात. हा गंध जमिनीवर, गटारीत, अडगळीत असलेल्या माद्यांना आकर्षित करतो. डासांच्या माद्याही आकाशाच्या दिशेने झेपावतात आणि नर डासांच्या झुंडीतसामील होऊन आपल्या पसंतीचा नर शोधतात. माद्या सुद्धा नृत्यात सामील होतात

नृत्य चालू असताना नरमादीची जोडी जुळली की ती जोडी झुंडीतून दूर निघून जाते आणि प्रणयक्रीडा करते. हे सर्व चालू असतानाच सगळ्याच डासांना मादी मिळतेच असे नाही. त्यामुळे काही डास माद्या न मिळाल्यामुळे प्रणयक्रीडा न करताच मरुन जातात.

नरांच्या तुलनेत माद्यांना जास्त आयुष्य लाभते. माद्यांच्या पाच ते सहा आठवड्याच्या जीवनकाळात एकदाच नराशी मिलन करण्याचा योग येतो. त्यानंतर त्या अंडी घालतात. माद्यांना अंड्यांचे कवच तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज असते. ही गरज भागवण्यासाठी माद्या माणसाला किंवा प्राण्यांना चावत असतात. माद्या माणसाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात आपल्या सोंडी खुपसतात आणि रक्त शोषून घेतात. यानंतर तीन दिवसांनी त्या अंडी घालतात. ही अंडी साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर सोडतात. पुढची अंडी घालण्यापूर्वी माद्यांना पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज असते. ही गरज भरून काढण्यासाठी माद्या पुन्हा माणसाचे किंवा अन्य कोणत्याही प्राण्याचे रक्त पितात

नर डासाला मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज भासत नाही. त्यामुळे ते माणसाला चावत नाहीत. नर डास फुलांतील मकरंदातून आणि वनस्पतींच्या पानांमधून अन्नरस शोषून घेतात आणि आपली गुजराण करतात. माद्या अंडी घालण्याच्या कालावधीतच माणसांच्या शरीरातील रक्त शोषून घेतात. इतर वेळी त्या फुलांच्या मकरंदावर, वनस्पतीवर आपली गुजराण करतात. O रक्तगट असलेल्या माणसाला डास अधिक प्रमाणात चावतात. A रक्तगटाच्या माणसाला डास कमी प्रमाणात चावतात. डास चावत असताना माणसाच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचे रसायन सोडतात. त्यामुळे डास जेथे चावतात, तेथे माणसाला खाज सुटते.

डास चावल्यानंतर खाज का सुटते?

उत्तर → डास चावत असताना माणसाच्या शरीरात अँटिकोगुलंट (Anticoagulant) नावाचे रसायन सोडतात. त्यामुळे डास जेथे चावतो, त्या ठिकाणी खाज सुटते. Anticoagulant मुळे रक्त गोठत नाही.

डासांमुळे होणारे रोग आणि लक्षणे (Mosquito-borne symptoms and Diseases):

डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासिस यांसारखे अनेक रोग होतात.

हिवताप: Malaria

मलेरिया रोगाचाचा प्रसार ॲनाफिलिस या डासांमार्फत होतो. खूप ताप येणे, थंडी वाजणे, अंग थरथरणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही मलेरिया होण्याची लक्षणे आहेत. मलेरियामुळे प्लेटलेट्‌सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते.

हत्तीरोग: elephantiasis /which mosquito causes elephantiasis?

क्युलेक्स डासांच्या मादीमुळे हत्तीरोग होतो. थंडी वाजणे, ताप येणे, पाय दुखणे, पायाचा आकार मोठा होणे ही हत्ती रोगाची लक्षणे आहेत.

डेंग्यू (Dengue): which mosquito causes dengue?

डेंग्यू हा रोग एडिस डासांच्या मादीपासून होतो.

डेंग्यूची लक्षणे: प्रचंड ताप येतो ,हाडे व स्नायू खूप दुखतात. थंडी वाजून ताप येतो. अंगावर सूज येते. शरीरावर पुरळ येतात. नाकातून, हिरड्यातून रक्तस्राव होतो. अशक्तपणा येतो.

Leave a comment