जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

भारतात अनेक ठिकाणी मशिदी आहेत, पण दिल्लीतील जामा मशिदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. हे Jama Masjid कोणी बांधले ? केव्हा बांधले ? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

जामा मशिदीला तुम्ही कसे जाल ? How to go to see Jama Masjit ?

तुम्ही जेव्हा दिल्लीला पर्यटनासाठी जाता तेव्हा राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल किल्ला, कुतुबमिनार इत्यादी स्थळांना भेटी देता. ही सर्व स्थळे नवी दिल्लीत आहेत. जामा मशिद जुन्या दिल्लीत आहे. आता मशिदीकडे कसे जायचे ते समजून घेऊया.

* तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला पाहायला गेलात असाल तर तेथून फक्त 15 किलोमीटर अंतरावर जामा मशिद आहे. येथून चालत किंवा कॅबने जाता येते.

* इंडिया गेट‌पासून जामा मशिद फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे.

* कुतुबमिनार ते जामा मशिद 16 किलोमीटर अंतरावर आहे

* जामा मशिद-Jama Masjit

ठिकाण : दिल्ली (जुनी दिल्ली)

जवळचे ठिकाण: लाल किल्ला

लालकिल्ल्यापासून अंतर:1.5 किमी.

हक्क. :भारत सरकार

स्थापत्य कला इण्डो-इस्लामिक

स्थापना. : 1644 ते 1656

निर्माणकर्ता. : शाहजहान

नमाज क्षमता. : 25000.

लांबी-रुंदी :40 मीटर X 27 मीटर

सर्वोच्च उंची :41 मीटर

तत्कालीन खर्च ;10,00,000 रुपये.

जामा मशिदीची निर्मिती आणि नामकरण: Creation and Naming of Jama Masjid

मुघल सम्राट शाहजहानने आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या आणि लोकप्रिय वास्तू उभारल्या. लाल महाल, ताज महाल या वास्तू त्यानेच उभारल्या. दिल्लीला शहाजहानाबाद असे नाव दिले होते.आपल्या सत्तेचे प्रतिकात्मक शक्ती स्थळ म्हणून जामा मशिद बांधले. 1644 साली या मशिदीच्या बांधकामास सुरुवात झाली .1656 साली या मशिदीचे बांधकाम पूर्ण झाले. इ स 1658 साली औरंगजेबने दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली ताब्यात घेतली आणि आपल्या पित्याला (शाहजहानला) तुरुंगात टाकले. शाहजहानने या मशिदीचे नामकरण मस्जिद-ए-जहान-नुमा असे ठेवले होते. हे मशिद जनतेसाठी खुले झाल्यावर पुढे काही कालावधीनंतर ‘जामा मशिद’ असे नाव ठेवण्यात आले.

जामा मशिदीची रचना आणि बांधकाम : Design and Construction of Jama Masjid.

दिल्लीतील म्हणजे तत्कालीन शाहजहानाबाद‌मधील सर्वांत मोठी मशिद म्हणून ही प्रसिद्ध आहे. ही इमारत लाल वाळूचा दगड आणि पांढरा शुभ्र दगड यांच्या साहाय्याने बांधलेली असून काही ठिकाणी काळा संगमरवरी द‌गड पण वापरलेला आहे. इ. स. 1644 ला या इमारतीचे बांधकाम सुरु झाले. तब्बल बारा वर्षांनतर म्हणजे 1656 साली हे बांधकाम पूर्ण झाले.

40 मीटर लांब आणि 27 मीटर रुंद असलेल्या इमारतीचा उपयोग तत्कालीन शाही कामकाजासाठी, दरबारासाठी केला जात असे. सध्या या इमारतीचा उपयोग मुस्लिम बांधवांच्या प्रमुख सणाच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठणासाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी केला जातो.

जामा मशिदीचा इतिहास: History of Jama Masjit

मुघल सम्राट शाहजहान याने ताजमहाल आणि लाल किल्ला बांधल्यानंतर जामा मशिद बांधण्यास सुरुवात केली. इ.स. 1644 साली सुरु झालेल्या या मशिदीचे काम इ स 1956 साली पूर्ण झाले. हे मशिद बांधण्यासाठी पाच हजार कामकार लागले. पांढरा शुभ्र संगमरवरी द‌गड, वाळूचा द‌गड, काळा संगमरवरी दगड वापरून हे मशिद बांधले. शाहजहान हा कल्पक होता. तसाच त्याला स्वकर्तृवाचा अभिमान होता .म्हणूनच त्याने दिल्लीला शाहजहानाबाद असे नाव दिले होते ,तर या मशिदीच्या नावातही आपले नाव गुंफून ठेवले होते. हे मशिद बांधून झाल्यावर लाने या मशिदीला मस्जिद-ए-जहान-नुमा असे नाव ठेवण्यात आले. हे मशिद बांधण्यासाठी भारतीय, तुर्की, अरब, युरोपीय कामगार आणि कारागीर यांचा समावेश केला होता.

शहाजहानने 26 जुले 1656 रोजी बुखारा उझबेकिस्तान येथील सय्यद अब्दुल गफूर शाह बुखारी यांना खास मेहमान म्हणून बोलावून त्यांच्या हस्ते या मशिदीचे उद्‌घाटन केले होते. शाहजहानच्या काळातील ही शेवटचीच वास्तू ठरली.याचे कारण म्हणजे औरंगजेबने 1658 साली आक्रमण करून शहाजहानाबाद (दिल्ली) ताब्यात घेतले .आणि शाहजहानला आग्रा येथे तुरुंगात टाकून सत्तेपासून दूर ठेवले. येथेच आठ वर्षे तुरुंगवास भोगून इ.स. 1666 रोजी शाहजहानने प्राण सोडला.

औरंगजेब नंतर दिल्लीत मुघल सत्ता खिळखिळी झाली होती. पुढे मराठ्यांनी वर्चस्व निर्माण केले. महादजी शिंदे याच्या सल्ल्यानेच दिल्लीचा कारभार सुरु झाला होता; पण महादजी शिंदेच्या मृत्यूनंतर दिल्लीत इंग्रजांचे प्राबल्य वाढू लागले इ. सन 1795 मध्ये थॉमस डॅनियलने जामा मशिद रंगवून घेतली होती. 1803 मध्ये इंग्रजांनी शाहजहानाबाद (दिल्ली) ताब्यात घेतले होते. दिल्लीत इंग्रजांविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये म्हणून आपल्या धोरणाब‌द्द‌ल सहानुभूती निर्माण होण्यासाठी इंग्रजांनी काही खास योजना आखला होत्या .दिल्लीतील बादशाहांची गादीरळ खालसा न करता ती पुढे तशीच चालू ठेवली.
मात्र बाद‌शाहाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या. इंग्रजांनी जामा मशिदीची दुरुती केली. नूतनीकरण केले. या ठिकाणी धार्मिक प्रवचने आयोजित केली. इतरत्रही काही ठिकाणी ख्रिश्चन, हिंदू धर्मस्थळांची देखभाल केली. रंगरंगोटी केली. आपोआपच तीव्र विरोधाचे रुपांतर सौम्य झाले.

1857 च्या उठावात तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल, कुंवदासह यांनी मुघल सम्राट बहादुरशाह जाफर याच्याकडे नेतृत्व दिले होते .त्यामुळे त्याचा फटका इंग्रजांना दिल्लीत बसला. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना मारले गेले .पण या उठावात अपयश आल्यामुळे इंग्रजांनी आपले धोरण कडक केले. संस्थांनांवर निर्बंध लाद‌ले .इंग्रजांची दडपशाही वाढली. ब्रिटिशांवर असंतोष वाढतच गेला. शेवटी 1862 मध्ये इंग्रजांनी जामा मशिद मुस्लिमांसाठी नमाज, पठण करण्यासाठी खुले केले.काही अटी घालून आपल्या पोलिसांच्या निरीक्षणाखाली धार्मिक कार्यक्रमास परवानगी दिली.

इस. 1886 मध्ये रामपूरच्या नवाबाने जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी 1,55,000 रुपये दिले. 1926 साली हैद्राबादच्या निजामाने 1,00,000 रुपयांची देणगी दिली. ही देणगी मशिदीच्या नूतनीकरणासाठी आणि अंतर्गत सजावटीसाठी वापरली.

1911 साला पासून ब्रिटिशांविरुद्ध असंतोष वाढत‌च गेला. दिल्लीच्या जामा मशिदीतूनही विरोध प्रकट होऊ लागला.या मशिदीत स्वातंत्र्य लढ्याचा हालचाली वाढल्या. अनेकदा स्वातंत्र्य लढ्याचे धोरण ठरवण्यास या मशिदीत हिंदू नेते, क्रांतिकारी येथे येऊ लागले.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण भारत-पाकिस्तान फाळणीमुळे हिंदू मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण झाले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आणि महात्मा गांधी यांनी भारतीय मुस्लिमांना भारतातच राहण्याचे आवाहन केले .त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला.

पुढे रामजन्मभूमी- बाबरी मशिद या कारणाने जामा मशिदही तणावाखाली होते. हिंदू-मुस्लिम यांच्या ऐक्यातच भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे, जनतेचे, आर्थिक सबलीकरणाचे हित आहे!

जय हिंद!

1 thought on “जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi”

Leave a comment