छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आणि तमाम महाराष्ट्रातील स्वाभिमानी रयतेच्या जिव्हारी लागणाऱ्या घटनेचे साक्षीदार म्हणजे Tulapur आणि वढू बुद्रुक ही दोन गावे होय.
वयाच्या तेवीस-चोवीसाव्या वर्षात बलाढ्य स्वराज्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडली ते स्वराज्याचे छत्रपती, ज्यांनी समर्थपणे स्वराज्याची जबाबदारी पेलली, मुघल, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज, आदिलशाहा, निजामशाहा यांच्याशी संघर्ष करताना तसूभरही डगमगले नाहीत ते स्वराज्याचे छत्रपती, प्रत्येक लढाईत अग्रभागी राहून लढाई जिंकून किंवा शत्रूला जरब बसवून मागे फिरणारे ते स्वराज्याचे छत्रपती, स्वकीयांच्या कट कारस्थानाला न डगमगता सामोरे जाऊन प्रथमदर्शनी समजूतीची भूमिका होऊन, पण पुन्हा पुन्हा तशाच चुकी,कारस्थाने होत असल्यास कारस्थान करणाऱ्याला आणि शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्याला हत्तीच्या पायी देऊन वचक निर्माण करणाऱ्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी, महाराज यांना गाफील ठेवून संगमेश्वर येथे पकडले गेले. तुळापूरला कैदेत ठेवले आणि निर्घृण हत्या केली. त्या तुळापूर आणि जवळच असलेल्या वढू गावी काय घडले. याबाबत आपण माहिती होणार आहोत.
* तुळापूरला कसे जायचे ? How to go to Talapur?
* तुम्ही पुण्यात असाल तर पुणे स्टेशन पासून तुळापूरला एक तासात जाता येते. पुणे ते तुळापूर 26 किलोमीटर अंतर आहे.
* पिंपरी चिंचवड येथून तुळापर 28 किलोमीटर अंतरावर आहे. येथूनही बसने किंवा फोर व्हिलरने एक तासात जाता येते.
आळंदी पासून तुळापूर 12 किलोमीटर अंतरावर आहे.
* भीमा कोरेगाव येथून तुळापूर जवळच आहे. कोरेगाव ते तुळापूर अंतर 11 किलोमीटर आहे.
* शिरूर पासून तुळापूर 51 किलोमीटर अंतरावर आहे. • तुळापूरला बसने किंवा आपल्या खासगी वाहनाने वरील ठिकाणाहून आरामात जाता येते.
* वढू या गावाला कसे जायचे? How to go to see Vadhu?
तुळापूर-वढू ही दोन्ही गावे जवळ जवळच आहेत. तुळापूर आणि वढू या दोन गावांच्या मधून भीमा नदी वाहते.
* पिंपरी-चिंचवड पासून वढू 41 किलोमीटर अंतरावर आहे • स्वारगेटडून वढू 34 किलोमीटर अंतरावर आहे.
तुळापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? What is famous for Tulapur?
छत्रपती संभाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचे अखेरचे काही दिवस यात तुळापुरात गेले होते. मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना पकडून आणून तुळापुरात कैद करून ठेवले होते. याच तुळापुरात जाऊन आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारका समोर नतमस्तक व्हायचे आहे.
* वढू कशासाठी प्रसिद्ध आहे? What is famous for Vadhu?
छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून आणून तुळापूरला ठेवले होते. तेथेच यांची 11 मार्च 1689 रोत्री शिर धडावेगळे करून निर्घृण हत्या केली आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांचे तुकडे तुकडे करून वढू गावच्या हद्दीत आणून टाकले होते. छत्रपतींच्या विटंबनेचा बदला मराठ्यांनी पुढे घेतला. औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावे लागले; पण स्वराज्य नष्ट झाले नाही. या वढू गावात येऊन आपण येथील माती कपाळाला लावून संभाजी महाराज यांच्या स्मारका समोर नतमस्तक व्हायचे आहे.
* तुळापुरात काय घडले ? What happened in Tulapur?
शृंगारपूरपासून जवळच असलेल्या संगमेश्वर (जिल्हा: रलागिरी) येथे छत्रपती संभाजी महाराज रंगनाथ स्वामीचा न्याय निवाडा करत होते. रंगनाथ स्वामी यांनी दोन-तीन दिवस जाणून बुजून वेळखाऊ धोरण घेतले होते. त्यात कान्होजी शिर्के मुघलांना इथ्यंभूत माहिती पुरवत होता. आणि सगळे खापर मात्र गणोजी शिर्केंवर फोडले. न्याय निवाडा चालू असतानाच मुकर्रब खानाने अचानक छापा टाकला आणि संभाजी महाराज यांना पकडले. 400-500 सैन्यानिशी संभाजी महाराज संगमेश्वरला तळ ठोकून होते. तर 4000-5000 सैन्यानिशी मुकर्रब खानाने छापा टाकला होता. त्यामुळे मराठ्यांचा नाइलाज झाला. फितुरी, विश्वासघात आणि बेसावधपणा या तीन बाबींमुळे स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाताला लागते.
तुळापूर ते बहादूरगड हे अंतर 10 किलोमीटरचे आहे . बहादूरगडावर औरंगजेब बादशारा येणार होता. याची माहिती मुकर्रब खानाला लागल्यामुळे तो संभाजी महाराजांना घेऊन बहादूर गडाच्या दिशेने वेगाने हालचाल करू लागला. मुकर्रबखान कराड-वडूज-दहीवडी- फलटण-बारामती-बहादूरगड असा प्रवास करत येत होता. सुरुवातीला चार-पाच हजार सैन्य होते. ते बहादूर गडावर येईपर्यंत 25000 झाले. वाटेत अनेक मुघल सैन्य मुकर्रब खानाला येऊन मिळाले. त्यामुळे संताजी व खंडोजी यांचा नाईलाज झाला.
मुकर्रब खान संभाजी राजे आणि कवी कलश यांना घेऊन 12 फेब्रुवारी 1689 रोजी बहादूर गडावर पोहोचला. यावेळी राजांची धिंड काढून विटंबना केली होती.
संभाजी राजे आणि कवि कलश यांना आयुष्यभर बंदी बनवण्याचा व स्वराज्याचा सर्व खजिना लुटण्याचा विचार औरंगजेबचा होता, म्हणून त्याने संभाजी राजांकडे प्रस्ताव पाठवला.
1) तुम्हाला आम्ही सोडतो, पण स्वराज्याचा खजिना कुठे ठेवला हे सांगा.
2) स्वराज्यातील संपूर्ण किल्ले ताब्यात द्यावेत..
बाकीच्या सर्व कपोलकल्पित अटी ब आहेत. त्या पुढील प्रमाणे—-
1) संभाजी राजे व कवी कलश यांनी मुसलमान धर्म स्वीकारावा.
2) संभाजी राजे यांनी औरंगजेबची मुलगी करुन घ्यावी.
3. स्वराज्य बरखास्त करुन औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारावी .
. या सर्व खोट्या अटी आहेत. औरंगजेबने स्वराज्याच्या चाव्या मागितल्या होत्या आणि सर्व किल्ले ताब्यात द्या अशी अट घालून जीवदान देण्याचे कबूल केले होते. पण संभाजी राजांनी दोन्हीही अटी धुडकावल्या. यामुळे त्यांचे 30 दिवस अतोनात हाल केले. तुळापुरात आणून साखळदंडात डांबून ठेवले. अंगाला चटके दिले. डोळे काढले; पण संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. अखेर राजांचे शिर धडावेगळे केले.
छत्रपती संभाजी महाराज स्मारक तुळापूर: Sambhaji Memorise Tulapur:
छत्रपती संभाजी महाराजांनी आपला प्राण तुळापुरातच सोडला. त्यामुळे तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तुळापुरात बांधले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 में 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला; तर मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापुरात झाला. औरंगजेबने त्यांची क्रूरपणे हत्या केली. तो एक निष्ठूर राजा होता. त्याच्याकडून कोणत्याही चांगल्या कार्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरले होते.
वढू मध्ये काय घडले: What happened in Vadhu?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर हत्येनंतर (11मार्च 1689) यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्याचे मांस वढू परिसरात टाकले होते. औरंगजेबासारखा नीच प्रवृत्तीचा बादशाह जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. अशा प्रकारच्या हाल अपेष्टा कोणत्याही राजाला भोगाव्या लागल्या नसतील. वस्तुस्थिती जरी अशी घडली असली तरी छत्रपती संभाजी राजांनी शक्तीच्या, बुद्धीच्या जोरावर जी आठ वर्षात युद्धे
केली, ती कोणीरी विसरणार नाही. त्यांचा पराक्रम, स्वराज्यनिष्ठा उच्च पराकोटीची होती. तरी सुद्धा त्यांचा चुकीचा इतिहास लिहून बदनाम करणारी पिलावळच जन्माला आली होती. सध्या परिस्थिती बदलली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा, स्वच्छ इतिहास समाजासमोर आला आहे.
वढू येथील महार समाजातील काही धाडसी लोकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मांसांचे तुकडे गोळा करून त्याचे रीतसर वढू गावाच्या हद्दीतच दहन केले. स्वराज्याच्या निष्ठावंत पाईकांनी ही भूमिका स्वतःच्या जीवावर उदार होऊन बजावली होती.
संभाजी महाराज स्मारक : वढू: Sambhaji Maharaj Memorise Vadhu:
“वढू येथे छत्रपती संभाजी महाराजचे अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे येथेही त्यांचे स्मारक बांधले आहे.
वढू येथे असलेले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधी आहेत. इ.स. 1719 मध्ये त्यांचे पुत्र शाहूराजे यांनी वढू बुद्रक आणि तुळापूर येथे संभाजीराजे यांचे वृंदावन बांधून अन्नछत्र चालू केले होते. सध्या येथे स्मारक बांधलेले आहे. या स्मारकाचे दर्शन घेऊन नसमस्तक होण्यातच आपला स्वाभिमान आहे.