Cholesterol and Heart Attack : कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार

सर्वसामान्यपणे आपल्या आरोग्याबद्दल आणि आरोग्याच्या जागृतीबद्दल समाजात प्रचंड निरक्षरता आहे. म्हणूनच आजाराचे आणि नवनवीन रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. अज्ञान हे सुद्धा अनेक रोगांचे मूळ आहे. कोलेस्टेरॉल [Cholesterol] च्या बाबतीतही असेच आहे. धावपळ, दगदग आणि बैठे काम, यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कधी वाढले हे लक्षातही येत नाही.

वयाच्या पंचविशीनंतर कष्टाची कामे करणाऱ्या वर्गाला वगळल्यास 60 ते 70% लोकांच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढलेले असते. याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याचा सवयी, बैठे काम, व्यायामाचा अभाव हेच आहे. तुम्ही दररोज निवांत चार किलोमीटर चालत असाल तर तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्याची शक्यता खूपच कमी असते. दररोज किमान 5 ते 10 मिनिटे घाम येण्याइतका आपला व्यायाम होतच नसेल तर कसे होणार कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी ?

आपले कोलेस्टेरॉल किती असावे ? How much should our Cholesterol be?

सर्वसामान्यपणे वैद्यकीय क्षेत्रात रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 150 ते 240 मिलिग्रॅम हे नॉर्मल मानले जाते. अमेरिकेत नॉर्मल कोलेस्टेरॉल (150 ते 240) असणारे 60% लोक आहेत. काही भागात हे प्रमाण 70% आहे. या नॉर्मल रेंजमध्ये कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांचे हार्ट ॲटॅकचे प्रमाणही 60 ते 70% आहे. आणि 145 पेक्षा कमी कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण 1 ते 2% सुद्धा नाही. म्हणजे नॉर्मल रेंज मध्ये असणारे कोलेस्टेरॉल सुरक्षित नाही, हेच सिद्ध होते.

कोलेस्टेरॉलचे प्रकार: Kinds of Cholesterol.

1) Total Cholesterol. एकूण कोलेस्टेरॉल

2) HDL कोलेस्टेरॉल

3) LDL कोलेस्टेरॉल

हे आपल्या शरीरात असलेल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे तीन प्रकार आहेत.

(1) Total Cholesterol

आपल्या शरीरातील रक्तात असलेल्या चरबीचे प्रमाण किती आहे, हे रक्ताची तपासणी केल्यानंतर लक्षात येते. वैद्यकीय क्षेत्राने 150 ते 240 मिलीग्रॅम ही नॉर्मल पातळी मानली असली तरी ती पूर्णतः सुरक्षित नाही. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 145 पेक्षा कमी असणे हे सर्वांत सुरक्षित मानले जाते. 150 ले 240 च्या दरम्यान कोलेस्टेरॉल अधिक काळ राहिल्यास रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस चरबीचा थर साचू लागतो. त्याचे रुपांतर भविष्यात रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज चे प्रमाण वाढण्यामध्ये होते. आणि त्यापुढची step म्हणजे हार्ट अटॅक होय. हा हार्ट अ‍टॅक टाळायचा असेल तर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 145 मिलीग्रॅम पेक्षा कमी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

2) HDL Cholesterol:(Good Cholesterol)

प्रत्येक माणसाच्या शरीरात HDL cholesterol असते. हे कोलेस्टेरॉल हृद‌यासाठी सुरक्षा कवच असते. रक्तातील HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 40 मिलीग्रॅम पेक्षा जास्त असावे. 30 पेक्षा कमी असलेले HDL कोलेस्टेरॉल सुरक्षा कवच म्हणून कसे काय काम करणार ? HDL कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी कोणतेही औषधोपचार नाहीत किंवा कोणताही आहार नाही. हे कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी एकच उपाय आणि तो म्हणजे व्यायाम! दररोज किमान 5 ते 10 मिनिटे हृद‌याची गती वाढवणारा व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायामाने HDL कोलेस्टेरॉल वाढवा आणि हृद‌याचे सुरक्षाकवच मजबूत करा.

3) LDL कोलेस्ट्रॉल:(Bad Cholesterol)

रक्तातील LDL कोलेस्टेरॉलला धोकादायक कोलेस्टेरॉल असे म्हटले जाते. HDL वाढले पाहिजे आणि LDL कमी झाले पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. रक्तातील LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 90 मिलिग्रॅमपेक्षा जास्त असू नये हे लक्षात ठेवावे.

हृद‌यविकार टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ? Measures to Prevent Heart Diseases

1) आपले वजन नियंत्रित असावे.

2) आहारात दूध, तूप टाळावेत.

3) रोजच्या आहारात 2400 पेक्षा अधिक कॅलरीज टाळाव्यात

4) रक्तातील कोलेस्टेरॉल 145 पेक्षा कमी करावे.

5) HDL कोलेस्टेरॉल 40 पेक्षा जास्त असण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

6) रक्तातील साखर उपाशीपोटी 120 पेक्षा कमी असावी आणि जेवल्यानंतर 160 पेक्षा कमी असावी.

7) अर्धातास व्यायाम करावा. योगासने करावीत, प्राणायाम करावा.

8) कंबर आणि नितंब (Hip) यांचे गुणोत्तर 0.85 पेक्षा कमी असावे. माझ्या कंबरेचा घेर 82 सेमी आहे आणि नितंबाचा घेर 90 सेमी आहे म्हणजे माझ्या कंबरेचे आणि नितंबाचे गुणोत्तर 80 /90= 0.91 येईल.हे प्रमाण आणखी थोडे कमी करण्यासाठी मला कंबरेचा घेर 5 सेमीने कमी करावा लागेल.

9) Body mass Index हा 22 पेक्षा कमी असावा. Body mass Index काढताना आपल्या वजनाला उंचीच्या वर्गाने भागावे. उदा. माझी उंची 1.75 मी आहे. आणि वजन 68 कि.ग्रॅ. आहे. तर माझा Body mass Index 22.22 येईल. 22 पेक्षा कमी येण्यासाठी माझे वजन 67 पेक्षा कमी हवे. वजन जास्त असणे ही अभिमानास्पद गोष्ट नाही. हे नेहमी लक्षात ठेवावे.

सर्वेशु सुखिन:सन्तु!

Leave a comment