गेल्या वर्षभर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी साठी वाहनधारकांना दिलेली मुदत 30 जूनला संपणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही 9 लाख 49 हजार 216 वाहनांपैकी 5 लाख 12 हजार 553 वाहनांनी नंबर प्लेट बसवलेली नाहीत. तर 43 हजार 930 वाहनधारकांनी नोंदणीच केलेली नाही.येत्या 38 दिवसांनी नंबर प्लेट वाहनधारकांना बसवावी लागणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना दिलेली ही अंतिम मुदतवाढ आहे. त्यामुळे एक जुलैपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायुपथक वाहनांवर कारवाई करणार आहे. एप्रिल 2019 पूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट्स मध्ये गैरवापर होत होती. या नंबर प्लेट सहजपणे काढता किंवा बदलता येत होत्या. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. वाहन चोरीनंतर चोरटे हा रजिस्ट्रेशन क्रमांक बदलत होते. त्यामुळे पोलिसांना वाहनांचा शोध घेणे मुश्किल बनले होते. एच एस आर पी नंबर प्लेट फक्त एकदाच वापरता येतात.