8000 villages facing water shortage-महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई: 8000 हून अधिक गावांना पाणीटंचाईच्या झळा

उष्णतेचे वाढते प्रमाण, प्रचंड तापमान,धरणांच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असलेली स्थिती आणि वळीव पावसाचा हूल यामुळे महाराष्ट्रात सुमारे आठ हजारहून अधिक गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकृत साप्ताहिक अहवालानुसार महाराष्ट्रातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये 633 गावे आणि 1652 वाड्या-वस्त्या टंचाईग्रस्त घोषित असून तेथे 660 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. म्हणजेच कागदावर केवळ 2285 महसूल व्हावे व वाड्या दाखवल्या आहेत. प्रत्यक्षात राज्यातील तब्बल आठ ते नऊ हजार गावे, वाड्यावर अनेक ठिकाणी तीव्रटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही आकडेवारी केवळ प्रशासकीय निकषांच्या चौकटीत बसणाऱ्या टँकर मंजूर झालेल्या गावांचेच आहे. त्यामुळे पावसाला अजून कितीतरी कालावधीचा अवधी असताना तीव्र पाणीटंचाईमुळे भीषण परिस्थिती निर्माण होईल अशी महाराष्ट्रात स्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात अधिक झळा

सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांच्या पाणी साठ्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याने या भागातच मोठ्या प्रमाणात तीव्र पाणीटंचाईचे संकट कोसळण्याचे शक्यता आहे. नजीकच्या काळात शासनाने ठोस उपाययोजना केली नाही तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. महाराष्ट्र शासनाने अद्यापही योग्य ठिकाणी केलेली दिसत नाही.

Leave a comment