गर्भावस्थेत तुम्हाला भरपूर खाण्याचा सल्ला दिला जातो . तुम्ही गरोदर आहात, म्हणजे तुम्ही भरपूर खाल्ले पाहिजे असे नाही तर तुम्ही संतुलित आहार घेणे जास्त गरजेचे असते .तुमच्या आहारामध्ये अनेक प्रकारची फळे भाज्या यांचा समावेश असला पाहिजे ..गर्भावस्थेत तुम्ही कोणती फळे खाल्ली पाहिजेत आणि कोणती फळे खाणे टाळले पाहिजे आणि त्यांचे होणारे फायदे आपण जाणून घेऊया ..
फळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. फळांमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात, जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. फळे तुमच्या आहारात असणे खूप गरजेचे असते . व्हिटॅमिन्स , तंतुमय पदार्थ , अनेक खनिजद्रव्ये असणारी फळे खाल्ल्याने आई आणि बाळाला पोषण मिळते . कोणती फळे खावीत आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे
गर्भावस्थेत फळे खाण्याचे फायदे: Benefits of eating fruits in Pregnancy
फळे खाल्ल्याने पोषणाच्या गरजा पूर्ण होतात: फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे ,खनिजे ,फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असतात. जसे की व्हिटॅमिन्स (C, A, B-complex), खनिजे (कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन), फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स. जी आई आणि बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात.
हाडांचे आणि दातांचे आरोग्य: फळांमध्ये असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आणि मॅग्नेशियम हाडांचे आणि दातांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
पचनक्रिया सुधारते: फळांमध्ये असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता (constipation) टाळता येते.
इन्फेक्शनपासून संरक्षण होते: फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C शरीराला इन्फेक्शनपासून संरक्षण देतात आणि इम्युनिटी वाढवतात. हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करतात, ज्यामुळे इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.
पाणी आणि हायड्रेशन: फळांमध्ये पाणी असते, जे शरीराचे हायड्रेशन राखण्यासाठी महत्त्वाचे आहे.
त्वचेसाठी फायदेशीर: फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची गुणवत्ता सुधारतात आणि त्वचेतील चमक वाढवतात. गर्भावस्थेत होणारे त्वचेशी संबंधित बदल (जसे की डाग, रेषा) कमी होण्यास मदत होते.
गर्भावस्थेत खाण्यासाठी योग्य फळे:
गरोदरपणात सफरचंद खाणे खूप गरजेचे असते . यात व्हिटॅमिन C, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते .
केळी:
केळीमध्ये फोलेट , व्हिटॅमिन C , B6 आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषण मूल्ये असतात . केळी पोटाच्या आरोग्यासाठी चांगली असतात, तसेच त्यात खूप ऊर्जा आणि पोटॅशियम असतो, जो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते .
संत्रे आणि मोसंबी:
व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत आहे , ज्यामुळे शरीरातील इन्फेक्शनविरोधी शक्ती वाढते.आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
पेरू: पेरूमध्ये व्हिटॅमिन C, फायबर्स आणि minerals असतात. ते हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. पेरूमुळे पचन सुधारते आणि बाळाचे मज्जासंस्था मजबूत होण्यास मदत होते.
आंबा:
आंब्यामध्ये व्हिटॅमिन A आणि C असतात, जे आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते . आंबा हे हंगामी फळ असल्यामुळे ते वर्षभर उपलब्ध होत नाही.
जाम्बू आणि बेरी: जाम्बू मध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, आणि फायबर्स असतात, जे इन्फेक्शनपासून संरक्षण देतात.
डाळिंब:
डाळिंब मध्ये आयरन, फॉलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्ताची कमी आणि हृदयविकार टाळण्यास मदत करते.
चिकू: चीकूमध्ये पोटॅशियम, फायबर्स, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते.
strawberry:
स्ट्रॉबेरी मध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन C असतात. ते इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.
गर्भावस्थेत खाऊ नये अशी फळे:
अर्धवट पिकलेली फळे:
गर्भावस्थेत अर्धवट पिकलेली फळे खाऊ नये , कारण त्यात जास्त लिंबू आणि अॅसिड असू शकते, ज्यामुळे पचनाच्या समस्यांमध्ये अडचणी येऊ शकतात.
अर्धवट पिकलेली पपई:
अर्धवट पिकलेली पपई मध्ये ‘पेपेन’ नावाचं एंझाइम असते, ज्यामुळे गर्भाशयाचे संकुचन होऊ शकते आणि त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
अननस:
काही गर्भवती महिलांना अनानस किंवा अन्य काही फळांवर ऍलर्जी होऊ शकते. यामुळे पचन, त्वचेच्या समस्या किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
गरोदरपणात फळे खाताना कोणती काळजी घ्यावी
गरोदरपणात फळे खाताना त्यांना चांगले धुणे अत्यंत आवश्यक आहे, कारण बागायती फळांवर कीटकनाशक किंवा इतर हानिकारक पदार्थ असू शकतात.
बराच वेळ कापून ठेवलेली फळे खाऊ नका किंवा कापल्यानंतर लगेच फळे खा.