Humanity is the true religion: मानवता हाच खरा धर्म आहे

कधी कधी मनाला असा प्रश्‍न पडतो की धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म ? हा प्रश्न मनाला पडण्याचे कारण म्हणजे सध्या जगात नाही, पण भारतात कधी नव्हे इतके धार्मिक ध्रुवीकरण झाले आहे. काय चालले आहे या भारतात ? परधर्माचा द्वेष म्हणजे स्पधर्माभिमान का ? कुठं नेऊन ठेवलाय भारत देश माझा ?असे अनेक प्रश्न मनाला पडतात. म्हणूनच आपण धर्म म्हणजे तरी काय? धर्म कुणी निर्माण केला ? का ? या प्रश्नांचे उकल साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया.

खरे तर पृथ्वी निर्माण झाली तेव्हा या पृथ्वीवर कोणताही जीव अथवा सजीव अस्तित्वात नव्हता. हळूहळू पाणी निर्माण झाले . या पाण्यात पहिले सूक्ष्म जीव निर्माण झाले. याच जीवजंतूंपासून पुढे लहान‌मोठे जीव निर्माण झाले. त्यांतीलच एक जीव म्हणजे माणूस होय. माणूस निर्माण झाला, तेव्हा तो चार पायांवर चालत होता.त्याची विचार करण्याची क्षमता विकसित झाली नव्हती. पुढे तो चालू लागला. समुहाने राहू लागला. आपल्यात एकोपा टिकण्यासाठी, शिस्त लागण्यासाठी आणि कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्याने एक नियमावली तयार केली या नियमावलीलाच माणूस पुढे धर्म म्हणू लागला.पती धर्म, पत्नीधर्म ,पुत्र धर्म, समाजधर्म ही सर्व धर्माचीच रुपे होती आणि आहेत. याचाच अर्थ पुरातन काळी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध असा कोणताही धर्म नव्हता.

खरंच मला खूप आश्चर्य वाटते .प्राचीन काळी माणसासाठी धर्म होता, आता एकविसाव्या शतकात धर्मासाठी माणूस आहे की काय ?असे गढूळ वातावरण निर्माण टाकले आहे. कृष्ण, बुद्ध, महम्मद पैगंबर, गुरु गोविंद सिंग, येशू ख्रिस्त, वर्धमान महावीर या सार‌ख्या अनेक विचारवंतांनी मानवता धर्माची शिकवण आपापल्या विचारानुसार दिली. त्यांच्या यांच्या विचारांचे समाजात प्रवाह निर्माण झाले. याच प्रवाहांचे पुढे धर्मात रुपांतर झाले. अनेक धर्म जन्माला आले, असे असले तरी कोणत्याही धर्माची पर धर्माची द्वेष करणारी नाही.

सध्या भारतात असे वातावरण आहे का? स्वधर्माबद्‌दल काहीच माहीत नाही असे कितीतरी विकृत लोक परधर्माबद्दल जाणीवपूर्वक द्वेष पसरण्याचे काम करत आहेत. कृष्ण असो की पैगंबर, बुद्ध असो की महावीर त्यांनी हीच शिकवण आपल्याला दिली आहे का ? या धर्मांध लोकांचा खूप तिटकारा येतो. यांनीच धर्म बदनाम केले आहेत. माणसा-माणसात प्रचंड द्वेषभावना निर्माण झाली आहे. धर्मा-धर्मात तेढ वाढवणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. धर्मनिरपेक्षता’ हा शब्द भारताच्या संविधानातून काढून टाकण्याची मागणी करणारे धर्मांध लोक काही कमी नाहीत. इकडे जगात विवेकवादी, निधर्मवादी लोक वाढत असताना भारतात मात्र धर्मांध शक्ती उफाळून येत आहेत. अनेक राजकीय पक्षांचा तो जाहीरनामाच झाला आहे. भारतात विचारवंत अल्पसंख्यांक झाले आहेत आणि धर्मांध लोक बहुसंख्यांक झाले आहेत. म्हणूनच मला असे वाटते की यांनी कुठे नेऊन ठेवलाय भारत देश माझा ?

खरा तो एकचिधर्म जगाला प्रेम अर्पावे

हा मंत्र आणि संदेश साने गुरुत्रीनी आपल्याला दिला .त्यांच्या विचारांचा वारसा आपण जगतो का ? सावित्रीबाई फुल्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या. त्यांना तत्कालीन सनातन्यांनी वाळीत टाकले. त्यांच्या अंगावर शेण मारले .द‌गड‌फेक केली. पण त्यांनी आपला वसा अर्धवट सोडला नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फतिमा रोख यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात योगदान दिले. पण आजच्या स्त्रिया सावित्रीला विसरून कर्मकांडात गुंतून गेल्या आहेत. शिकल्या, पण शहाण्या झाल्या नाहीत. अर्धवट शिक्षणामुळेच कर्मकांड वाढत चालले आहेत.

Leave a comment