Thalapathy Vijay CM news-थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा: राज्यपालांचे शपथविधीसाठीचे पत्र

सध्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पराभव झाल्यामुळे गुंतागुंतीचे राजकारण निर्माण झाले होते. थलपती विजय यांनी तीन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या टीव्हीके या पक्षाला सर्वात जास्त म्हणजे 108 जागा मिळाल्या. त्यांचे 108 आमदार निवडून आलेत; पण त्यांना काही बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली. राहुल गांधी यांना फोन केला. काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचे कबूल केले आणि पाठिंबाही दिला ;पण तरीसुद्धा बहुमताचा आकडा कमी पडत होता. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे भाजपाचा जळफळाट झाला. राज्यपालांच्या मार्फत थलपती विजय यांचा शपथविधीचा मार्ग रोखण्यासाठी खटाटोप चालू केला. पण भारतात प्रचंड प्रमाणात टीका होऊ लागल्याने अखेर राज्यपालांनी थलपती विजय यांना मुख्यमंत्र्याची शपथ घेण्यासाठी निमंत्रण दिले आहे . त्यामुळे आता थलपती विजय हे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामार्फत झाले आहे. तामिळनाडूमध्ये भाजपाचा केवळ एकच आमदार आहे. तरीसुद्धा भाजप कुरगुड्यांचे राजकारण करत आहे.

Leave a comment