सध्या महाराष्ट्रात प्रचंड तापमान वाढल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मार्च,एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्याचे उन नकोसे वाटत आहे. प्रचंड उष्णता आणि तापमान यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. काही लोकांना अस्वस्थतेचा त्रास होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने आणि हवामान खात्याने केले आहे.
बंगालच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमान 40° पेक्षा जास्त राहणार आहे. विशेषतः अहिल्यानगर,छ. संभाजीनगर, जळगाव, मालेगाव,परभणी, अकोला, अमरावती,बुलढाणा, सोलापूर, वाशिम,वर्धा इत्यादी जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये तापमान 40° पेक्षा तीन ते चार अंशानी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातीलच नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. घरातून बाहेर पडू नये.