NEET Exam Cancel News-नीट परीक्षा रद्द: पेपर फुटीचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना

पेपर फुटीमुळे अखेर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट युजी 2026 परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पेपर फुटीचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात बसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी शहरांमध्ये भाड्याच्या खोल्या घेऊन आणि खानावळ लावून अभ्यास करण्यासाठी जात असतात.या विद्यार्थ्यांना आता परीक्षा पुन्हा होईपर्यंत शहरांमध्येच राहावे लागले तर तो खर्च परवडणार आहे का? गरीब विद्यार्थ्यांना हा खर्च परवडणार नाही.त्याचबरोबर मुलांचे मानसिक खच्चीकरणही होत आहे. एकापेक्षा एक असे अनेक पेपरफुटीच्या मालिका होत आहेत.पण सरकारचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशा गोष्टी होतात हे स्पष्ट झाले आहे.

पेपर फुटीचे लातूर, पुणे,नाशिक कनेक्शन

नट परीक्षेचे पेपर फुटीचे महाराष्ट्रात लातूर, नाशिक आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.या पेपर फुटीची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडे आदेश दिले आहेत. सीबीआय पूर्ण चौकशी करून कारवाई करत नाही तोपर्यंत अशा प्रकारे नवीन नवीन पेपर फुटीची प्रकरणे होतच राहणार आहेत. त्यामुळे मुलांचा या परीक्षेवरील विश्वास उडत जाणार आहे. परिणामी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

Leave a comment