Sambhaji Maharaj history-छत्रपती संभाजी महाराज सुटकेचा लढा

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना सोडविण्याचा प्रयत्न झाला होता. याचा अस्सल कागदपत्रांच्या आधारे पुरावे सापडले आहेत. संगमेश्वर येथे न्याय निवाडा करत असताना अचानक मुकर्रब खानाने वेढा घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले होते. त्यानंतर त्यांना आंबा घाटातून कोल्हापूरला न आणता शिराळा मार्गे मिरजला नेले होते. मिरजला मुघलांचा मोठा तळ होता. आणि तेथे गेल्यावर मराठे हल्ला करू शकणार नाहीत, याची मुकर्रब खानाला जाणीव होती. त्या अगोदर शिराळा येथील बहादूरगडावर संभाजी महाराजांना नेले होते. येथे मुक्काम करून पेठमार्गे पुढे रवाना झाल्याचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत.

इतिहास अभ्यासक काय म्हणतात?

इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख, अरविंद भोसले आणि दत्ताजी नलावडे यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्याची पाहणी केली तेथील तीन विरघळ आढळल्याची त्यांनी माहिती दिली. मराठ्यांची सत्ता कोल्हापूरला असल्यामुळे धोका न पत्करता मुकर्रबखानाने आडवाट निवडली. परंतु त्याच्या 25 हजार सैन्याला 32 शिराळा येथील तुळाजी निकम देसाई , आप्पाजी दीक्षित यांची 250 ते 300 जणांची तुकडी सामोरे गेली. महाशिवरात्रीच्या आधी चार दिवस शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरून संभाजी महाराजांना सोडवण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला त्या दोघांनाही पकडले. राजाराम महाराजांना ही बातमी समजल्यावर त्यांनी आप्पाजी दीक्षित आणि तुळाजी निकम देसाई यांना जमीन बक्षीस दिली. ती जमीन आजही त्यांच्या वंशांच्याकडे आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही हे आता चुकीचे ठरले असून सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, पण मराठे त्यांत यशस्वी झाले नाहीत.

Leave a comment