Importance of bicycle use-सायकलचा वापर: काळाची गरज

सध्या पश्चिम आशियात तणावाचे वातावरण असल्यामुळे आणि होर्मुझ खाडी अद्यापही खुली न झाल्यामुळे भारताला योग्य दरात पेट्रोल मिळेनासे झाले आहे. भारताने इराणशी असलेली मैत्री तोडल्याने त्याचा दुष्परिणाम भारत सध्या भोगत आहे. सरकारच्या एका चुकीच्या धोरणाचा फटका संपूर्ण भारतीय जनतेला बसत आहे. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे आणि चढ्या दरात केलेल्या खरेदीमुळे नजीकच्या काळात पेट्रोलचे दर वाढतील असा अंदाज आहे.म्हणूनच सरकारने पेट्रोलचा कमी वापर करा, वाहनांचा कमी वापर करा, प्रवास कमी करा, परदेश दौरे कमी करा असे फुकटचे सल्ले लोकांना दिले आहेत; पण प्रधानमंत्री पासून त्यांच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार यांच्या वाहनांचे ताफे काही अजून कमी झाले नाहीत. मग पेट्रोलची बचत कशी होणार? याच सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव उतरले असताना मात्र पेट्रोलचे दर भारतात स्थिर ठेवले.त्यामुळेच सुमारे 50 लाख कोटी रू पेक्षा अधिक फायदा त्यामुळे झाला. त्याचे काय झाले? तो फायदा कुठे दडकला गेला? जनतेच्या खिशाला त्याचा चाट बसलास ना! मग आत्ताच दर वाढवायची काय गरज होती?

सायकल वापरणे काळाची गरज

पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या अति वापरामुळे जागतिक तापमानात भर पडत आहे. ही वस्तुस्थिती आहे.सध्या आखाती देशातील तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा आणि वाढलेले दर याचाही फटका देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बसत आहे. कमी प्रवासाच्या ठिकाणी जर सायकल वापरली तर पेट्रोलचा ताण बराच कमी होईल. लोकांचा व्यायाम चांगला होईल. आरोग्य चांगले राहील आणि वैयक्तिक आर्थिक स्थिती पण त्यामुळे चांगली राहील. म्हणूनच कमी प्रवासासाठी सायकल वापरणे ही काळाची गरज आहे.

Leave a comment