ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. उकाड्याने माणूस हैराण झाला आहे. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ दहा धरणे आता कोरडी पडली असून 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे.
महाराष्ट्रातील पाणीसाठ्याचे अवस्था
महाराष्ट्रात मोठी 138 , मध्यम 264 आणि लहान आकाराची 2626 अशी एकूण 3028 धरणे आहेत. या सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता १७१५ टीएमसी इतकी आहे. मात्र सध्या धरणांमध्ये 478 टीमची इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणांपैकी दहा धरणे तर कोरडी टाक पडली असून दहा ते बारा धरणांमध्ये नाममात्र पाणी साठा आहे.
धरणांमधील पाण्याची बिकट अवस्था
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण सोलापूर जिल्ह्यात असून हे उजनी धरण कोरडे ठणठणीत पडले आहे. तसेच खडकपूर्णा हे बुलढाणा जिल्ह्यातील धरण, बीड जिल्ह्यातील बोरगाव, शिरस मार्ग, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर,सीना कोळेगाव ही धारावी जिल्ह्यातील धरणे, लातूर जिल्ह्यातील बिंदगी हे धरण, नाशिक जिल्ह्यातील भावली धरण, टेमघर,लोणावळा ही पुणे जिल्ह्यातील धरणे कोरडी पडली आहेत. याशिवाय 17 मोठ्या धरणांमध्ये अवघा दहा ते बारा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
पुणे विभागात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा
पुणे विभागाला पाण्याचा विभाग म्हणून ओळखला जातो;पण याच विभागात सर्वाधिक म्हणजे 724 धरणे असून राज्याच्या एकूण 1715 टीएमसी पाणी साठ्यांपैकी 650 टीएमसी पाणीसाठा पुणे विभागातील धरणांमध्ये होतो. असे असतानाही यंदा पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यातील 175 गावे आणि 1157 वाड्यावर त्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
पाऊस वेळेवर लागला नाही तर महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाईची शक्यता
सध्या महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण आहे. अधून मधून वळीव पाऊस लागला नाही तर किंवा मोसमी पाऊस वेळेवर आला नाही तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.पाण्यापासून माणसांचे खूप हाल होईल अशी स्थिती निर्माण होऊ शकते. महागाईचा आगडोंब वाढलेला असताना आता हे पाण्याचे हे नवीन संकट महाराष्ट्राची अवस्था खिळखिळी करून टाकते की काय असे वाटते.